सॉफ्ट टेनिस असोसिएशन तर्फे खेळाडूंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 14:29 IST2019-03-27T14:29:47+5:302019-03-27T14:29:59+5:30

अकोला : अकोला जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या वतीने नुकताच रावणकार हॉस्पिटल येथे अकोला जिल्ह्यातून पहिल्यांदाच राष्ट्रीय व राज्य स्तरावर अकोला जिल्ह्याचे   नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

Soft Tennis Association felicitates players | सॉफ्ट टेनिस असोसिएशन तर्फे खेळाडूंचा सत्कार

सॉफ्ट टेनिस असोसिएशन तर्फे खेळाडूंचा सत्कार

अकोला : अकोला जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या वतीने नुकताच रावणकार हॉस्पिटल येथे अकोला जिल्ह्यातून पहिल्यांदाच राष्ट्रीय व राज्य स्तरावर अकोला जिल्ह्याचे   नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
 या मध्ये शालेय राष्ट्रीय स्पर्धेत  पार्थ ठाकरे, राष्ट्रीय स्तर स्पर्धे मध्ये यश नेमाडे,पियुष परमाणे, ईश्वरी घनबहादूर, आयेशा सिद्दीकी, शालेय राज्यस्तरावर अर्णव देशमुख, वरून गुप्ता,पियुष मल्होत्रा, पार्थ ठाकरे, प्रशिष वानखडे, आकांशा साखरे,माही वोरा, ईश्वरी टाकाळकर,सहभागी झाल्याबद्दल तसेच त्यांचे प्रशिक्षक  सागर निळे यांचा अकोला जिल्हा सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ अमोल रावणकार ,कार्याध्यक्ष   निखिलेश दिवेकर, उपाध्यक्ष  रजनीश ठाकरे,  सचिव  ज्ञानेश टाले, कोषाध्यक्ष  नारायण बत्तुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ अमोल रावणकार यांनी आतंरराष्ट्रीय स्तरावर अकोला येथील खेळाडू पारितोषिक मिळवण्याच्या व सॉफ्ट टेनिस चे माहेर घर अकोला अशी ओळख होण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व नक्कीच प्रयत्न करू , असे मत व्यक्त केले.  सर्व सहभागी खेळाडूचे अभिनंदन व उज्वल भविष्या करीता शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन श्री ज्ञानेश टाले यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश रावणकार यांनी केले .यावेळी  प्रवीण ठाकूर ,  पल्लवी रावणकार,  मंगेश पाथ्रीकर तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते

Web Title: Soft Tennis Association felicitates players

टॅग्स :Akolaअकोला