कोरोनाला रोखण्यासाठी सामाजिक संघटना सरसावल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:19 IST2021-05-08T04:19:44+5:302021-05-08T04:19:44+5:30
या मोहिमेंतर्गत गावातील प्रत्येक घरात आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच एकवीस दिवसांच्या कालावधीत सात-सात दिवसांच्या फरकानुसार उर्वरित दोन, ...

कोरोनाला रोखण्यासाठी सामाजिक संघटना सरसावल्या!
या मोहिमेंतर्गत गावातील प्रत्येक घरात आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच एकवीस दिवसांच्या कालावधीत सात-सात दिवसांच्या फरकानुसार उर्वरित दोन, असे एकूण तीन सर्वेक्षण केले जाणार आहेत. तसेच लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. ज्योत फाउंडेशनच्या वतीने गरजूंना अत्यावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात येत आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या संदिग्ध रुग्णांना घरीच क्वारंटाइन केले जात आहे. मोहिमेंतर्गत आहारासंबंधी घरोघरी माहिती देणे, आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णाची प्रकृती ठीक न वाटल्यास लगेच त्यांना कोविड सेंटरला हलविणे, तसेच कोरोनाविषयक जनजागृती करण्यात येत आहे. ही मोहीम सरपंच वैशाली ज्ञानेश्वर काळंके यांच्या मार्गदर्शनात ऋषीकेश मिसळकर, सौरभ राहाटे, विशाल येरोकार, अंकुश ढोले, सुमित चोरे, अमर चोरे, मयूर बागडे, स्वराज बागडे यांच्यासह ग्रामस्थ राबवीत आहेत.