शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘गुटखा बंदी’साठी सामाजिक कार्यकर्ते करणार आत्मदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 14:12 IST

अकोला : राज्यभरात ग्राहक चळवळ सशक्त करणाऱ्या नॅशनल कंझ्युमर प्रोटेक्शन आॅर्गनायझेशनच्यावतीने पदाधिकारी गुटखा बंदीच्या संदर्भात सोमवार, ११ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष संजय पाठक यांनी सांगितले.

ठळक मुद्देअवैध गुटखा विक्री व त्याची साठवण करणाºयावर कठोर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. यासाठी आॅर्गनायझेशनने १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. ११ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.

अकोला : राज्यभरात ग्राहक चळवळ सशक्त करणाऱ्या नॅशनल कंझ्युमर प्रोटेक्शन आॅर्गनायझेशनच्यावतीने पदाधिकारी गुटखा बंदीच्या संदर्भात सोमवार, ११ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष संजय पाठक यांनी सांगितले.शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पाठक यांनी माहिती दिली. अकोला जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीला जोर आला आहे. जिल्हा व पोलीस प्रशासन यंत्रणा याकरिता कुचकामी ठरली आहे. युवापिढी यामुळे व्यसनाधीन होऊन त्यांचे आरोग्य बिघडत आहे. राज्यात सर्वत्र गुटखा बंदी असतानाही अकोला शहरात सर्रास गुटखा व अन्य तत्सम अमली पदार्थ उघडपणे विक्री होत आहे. अवैध गुटखा विक्री व त्याची साठवण करणाºयावर कठोर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. यासाठी आॅर्गनायझेशनने १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकाराने आमरण उपोषण पाच दिवसात सोडविण्यात आले होते. या उपोषणास राज्यभरातही सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधींनी पाठिंबा देत उपक्रमाचे स्वागत केले होते. पालकमंत्री यांनी यासंदर्भात कार्यवाही करण्याची ग्वाही दिली होती; मात्र दोन महिने उलटल्यावरही अद्याप गुटखा विक्री करणाºयांवर कारवाई झाली नाही. म्हणून ११ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.आॅर्गनायझेशनच्या या सामाजिक उपक्रमास नागरिक व संस्थांनी सहकार्य करावे, असे पाठक म्हणाले. याप्रसंगी आॅर्गनायझेशनचे विदर्भ अध्यक्ष गजानन वारकरी, विदर्भ महिला अध्यक्ष टीना देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Akolaअकोला