So far only 16% sowing of rabi is done in the state | राज्यात आतापर्यंत केवळ १६ टक्केच रब्बीची पेरणी
राज्यात आतापर्यंत केवळ १६ टक्केच रब्बीची पेरणी

- राजरत्न सिरसाट
अकोला: मान्सून उशिरा पोहोचल्याने यावर्षी खरीप हंगाम उशिरा सुरू झाला. परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी पेरणीसाठीच्या मशागतीची कामे आता सुरू झाली असून, आजमितीस राज्यात ९ लाख हेक्टर, १६ टक्केच पेरणी झाली. ही परिस्थिती बघता रब्बी हंगाम तीन आठवडे पुढे जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्यातील रब्बी हंगामातील पीक पेरणीचे क्षेत्र ५६ लाख हेक्टर आहे. गत काही वर्षांत पावसाच्या अनिश्चिततेमुळे राज्यात रब्बीची पेरणी घटली होती. यावर्षी पूरक पाऊस पडला; परंतु हा पाऊस आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातही पडल्याने रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी शेताची मशागत करण्यास शेतकऱ्यांना वेळ लागत आहे. राज्यासह विदर्भातील परिस्थिती रब्बी पेरणीसाठी अद्याप पूरक नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान,पीक काढल्यानंतर लगेच काढता येत नाही त्याला दोन एक दिवस शेतात ठेवावे लागते,शिवाय काढणीसाठी लागणारे मळणी यंत्रही वेळेवर मिळत नाही.अशातच ओडिशा राज्यात आलेल्या ‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे विदर्भातही पाऊस येतोय का, या भीतीने शेतकऱ्यांनी पीक कापणी थांबविली होती. त्यामुळे अनेक भागातील शेतकºयांनी आता सोयाबीन व ज्वारी काढणी सुरू केली आहे.
विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी सहा लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्षात आतापर्यंत १ लाख ६० हजार हेक्टर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक हरभरा पेरणीवर शेतकºयांनी भर दिला आहे. यावर्षी धरणांमध्ये मुबलक जलसाठा असल्याने गव्हाचे क्षेत्रही वाढणार आहे. नागपूर विभागात गतवर्षी ४ लाख ११ हेक्टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले होते. पेरणी ३ लाख ५५ हेक्टरवर झाली होती. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. यानुषंगाने कृषी विभागाने ४,११८.०९ हेक्टरचे नियोजन केले आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत २९ हजार ७३ हेक्टर म्हणजेच ७.२३ टक्केच पेरणी झाली आहे.


अवेळी व परतीचा पाऊस लांबल्याने शेतकºयांना पीक काढणी करता आली नाही. पावसाने उसंत दिल्यानंतर ही कामे सुरू झाली आहेत. आता मशागतीच्या कामांना वेळ लागणार असल्याने यावर्षी दोन ते तीन आठवडे रब्बी हंगाम पुढे जाणार आहे.
- सुभाष नागरे,
विभागीय कृषी सहसंचालक,
अमरावती.

 

Web Title: So far only 16% sowing of rabi is done in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.