भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर पाच वर्षांत सहा लाखांचा खर्च; तरी समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:17 IST2021-01-22T04:17:51+5:302021-01-22T04:17:51+5:30

शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यात पिसाळलेल्या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या अनेक घटना उजेडात आल्या ...

Slaughter of stray dogs at a cost of Rs 6 lakh in five years; The problem persists though | भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर पाच वर्षांत सहा लाखांचा खर्च; तरी समस्या कायम

भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर पाच वर्षांत सहा लाखांचा खर्च; तरी समस्या कायम

शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्यात पिसाळलेल्या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या अनेक घटना उजेडात आल्या आहेत. नागरिकांचा वाढता राेष लक्षात घेता मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला हाेता. कुत्रे पकडण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. तसेच नसबंदीसाठी पशू व मस्त्य विज्ञान स्नातकाेत्तर संस्थेची नियुक्ती केली. मागील चार वर्षांच्या कालावधीत प्रति दिवस चार किंवा पाच याप्रमाणे विज्ञान संस्थेने ७०० पेक्षा अधिक कुत्र्यांची नसबंदी केली आहे. याबदल्यात संस्थेला प्रति कुत्रा १२०० रुपये यानुसार आजपर्यंत सहा लाख रुपये अदा करण्यात आले असून उर्वरित देयक थकीत असल्याची माहिती आहे.

कुत्रे पकडण्यासाठी चार कर्मचारी

काेराेनामुळे मागील दहा महिन्यांपासून भटके कुत्रे पकडण्याची माेहीम बंद हाेती. मनपाने नियुक्त केलेल्या खासगी कंत्राटदारासहित चार कर्मचारी कुत्रे पकडतात. शहरात कुत्र्यांची वाढलेली संख्या पाहता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येते.

या भागात सर्वाधिक कुत्रे

जुने शहरातील भांडपुरा चाैक, कमला वाशिम बायपास चाैक, माेठी उमरी रेल्वे पूल, अकाेटफैल चाैक, माेहम्मद अली मार्ग, सिंधी कॅम्प राेड आदी भागात सर्वाधिक माेकाट कुत्रे आहेत.

राेज १२ तक्रारी

मनपाने नियुक्त केलेल्या गाेमाशे नामक कंत्राटदाराकडे कुत्रे पकडण्यासाठी दरराेज किमान दहा ते बारा तक्रारी येतात. कुत्रे पकडण्यासाठी गेल्यानंतर भटके कुत्रे गल्लीबाेळातून पळ काढतात. त्यामुळे समस्या कायमच राहते.

भटके कुत्रे पकडण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. काेराेनामुळे कुत्रे पकडण्याची माेहीम बंद केली हाेती. आता ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राहील.

- पूनम कळंबे उपायुक्त (विकास), मनपा

१२०० रुपये

खर्च येताे एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी

एका एजन्सीला दिले प्रशासनाने कंत्राट

Web Title: Slaughter of stray dogs at a cost of Rs 6 lakh in five years; The problem persists though

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.