सहा वर्षांत १०८ रुग्णवाहिकेने वाचविले सहा लाख अपघातग्रस्तांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:18 IST2021-02-05T06:18:53+5:302021-02-05T06:18:53+5:30
आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून एमईएमएस १०८ रुग्णवाहिका सेवेने २०१४ पासून अपघात व ...

सहा वर्षांत १०८ रुग्णवाहिकेने वाचविले सहा लाख अपघातग्रस्तांचे प्राण
आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून एमईएमएस १०८ रुग्णवाहिका सेवेने २०१४ पासून अपघात व आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १०८ रुग्णवाहिकांनी सेवा प्रारंभ केल्यापासून राज्यात तब्बल ४००५०४ अपघातग्रस्त रुग्णांनी रुग्णवाहिकेची सेवा घेतली आहे. अकोला जिल्ह्यात सेवा देणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेकडील माहितीनुसार, अपघातातील जखमी रुग्णांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२० मध्ये ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. अकोला विभागात १०८ रुग्णवाहिकेने सेवा सुरू झाल्यापासून ६४७६६९ रुग्णांवर यशस्वीरीत्या उपचार करून त्यांची वाहतूक केली गेली. यामध्ये आरटीए, प्रेग्नेन्सी, कार्डियाक इत्यादी समाविष्ट आहे. विभागात ४६५४१ अपघातग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार आणि वाहतूक केली.
गत सहा वर्षांतील स्थिती (२०१४ ते २०२०)
जिल्हा - एकूण वाहतूक रुग्ण - रस्ते अपघात - टक्केवारी
वाशीम - ७१३०१ - ५९६१ - ८.४
यवतमाळ - १३७८५७ - १११६८ - ८.१
बुलडाणा - १३४६२५ - १०२९२ - ७.६
अमरावती - २०१४६६ - १३३९५ - ६.६
अकोला - १०२४२० - ५७२५ - ५.६
अपघाताच्या घटनांची तुलना
महिना - २०१९ - २०२०
जानेवारी - १०४ - ८६
फेब्रुवारी - १०७ - ६६
मार्च - ११० - ९१
एप्रिल - ८१ - १२
मे - ८४ - ३०
जून - ५२ - २२
जुलै - ६० - ३०
ऑगस्ट - ४३ - ३४
सप्टेंबर - ४५ - २६
ऑक्टोबर - ३४ - ४९
नोव्हेंबर - ७२ -७३
डिसेंबर - ८० - ५१