रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST2021-02-05T06:17:27+5:302021-02-05T06:17:27+5:30
अकोला : बाळापूर तालुक्यातून जिल्हाभर रेतीची माेठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असताना याकडे महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष हाेत असतानाच ...

रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर जप्त
अकोला : बाळापूर तालुक्यातून जिल्हाभर रेतीची माेठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असताना याकडे महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष हाेत असतानाच दहशतवाद विराेधी पथकाने बाळापूर तालुक्यात छापेमारी करत सहा ट्रॅक्टर पकडले. रेतीसह तब्बल ४० लाख रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला असून रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
बाळापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापूर शहराजवळील मन नदीपात्रातून रेतीची माेठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करण्यात येत असल्याची माहिती दहशतवाद विराेधी पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने धाड टाकली असता या ठिकाणी साठवणूक केलेली रेतीसह ६ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. या संपूर्ण कारवाईत दहशतवाद विरोधी पथकाने अंदाजे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये (एमएच २८ एबी ८२७० क्रमांकाचा ट्रक), (एमएच. ०४ एफजे ००९३, एम एच ३० बीबी १५३२, एम एच ३० बीबी १४१९, एम एच ३० एव्ही ५८४२, एम एच ३० एझेड ४६०४) या वाहनांचा समावेश आहे. ही वाहने बाळापूर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आली आहेत.
पाेलीस पकडतात महसूल साेडते
पाेलीस सापळा रचून रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रक व ट्रॅक्टर पकडतात. मात्र त्यानंतर महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी ही वाहने काेणताही दंड न करता परस्पर साेडत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. रेतीच्या अवैध वाहतुकीमागे महसूल विभागाची माेठी हप्तेखाेरी असून त्यामुळेच रती माफिया या महसूल अधिकाऱ्यांना मारहाण करेपर्यंत हिंमत करत असल्याचे वास्तव आहे.