पवन महल्लेसह सहा जण दोन वर्षांंसाठी तडीपार

By Admin | Updated: August 27, 2016 03:04 IST2016-08-27T03:04:00+5:302016-08-27T03:04:00+5:30

उत्सवाच्या पृष्ठभूमीवर अकोला पोलिसांची कारवाई.

Six people, including Pawan Mahal, have been cleared for two years | पवन महल्लेसह सहा जण दोन वर्षांंसाठी तडीपार

पवन महल्लेसह सहा जण दोन वर्षांंसाठी तडीपार

अकोला, दि. २६: शहरात घडलेल्या विविध गुन्हय़ांमध्ये सहभाग असलेल्या संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष पवन महल्ले, संदीप बाथो यांच्यासह सहा आरोपींना जिल्हय़ातून दोन वर्षांंसाठी तडीपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी शुक्रवारी रात्री देशमुख फैल परिसरातील रहिवासी असलेल्या सहा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांवर दोन वर्षांंच्या तडीपारीचे आदेश दिले आहेत. देशमुख फैल येथील रहिवासी तसेच संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष पवन मुगुटराव महल्ले, संदीप सतीश बाथो रा. देशमुख फैल, प्रदीप भाऊराव कांबळे, रा. देशमुख फैल, नीलेश मधुकर नवले रा. देशमुख फैल, अब्दुल साहीद अब्दुल गणी रा. देशमुख फैल आणि दिनेश गजानन कावळे रा. लहान उमरी या सहा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांना धार्मिक सण, उत्सवाच्या पृष्ठभूमीवर जिल्हय़ातून दोन वर्षांंसाठी तडीपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी शुक्रवारी सायंकाळी दिले. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांपूर्वीच जिल्हय़ातील १७५ वर गुन्हेगारी प्रवृत्तींना जिल्हय़ातून तडीपार करण्यात आले असून त्यानंतर आता पुन्हा सहा जणांना जिल्हय़ातून दोन वर्षांंसाठी तडीपार करण्यात आले आहे. यामधील पवन महल्ले हे एका पोलीस कर्मचार्‍याला मारहाण प्रकरणात एक ते दीड वर्ष कारागृहात होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची सुटका झाली असून सुटका होताच महल्ले यांना दोन वर्षांंसाठी जिल्हय़ातून तडीपार करण्यात आले आहे.

Web Title: Six people, including Pawan Mahal, have been cleared for two years