सहा लाखांचे सोयाबीन तेल लंपास
By Admin | Updated: July 15, 2014 00:17 IST2014-07-15T00:17:01+5:302014-07-15T00:17:01+5:30
सोयाबीन तेलाचे डबे, प्लास्टिक कॅन आणि पाऊच भरून पाठविण्यात आलेला ट्रक संबंधित दुकानदारापर्यंंत पोहोचलाच नसल्यामुळे

सहा लाखांचे सोयाबीन तेल लंपास
बाळापूर : येथील सोयाबीन तेल कारखान्यातून वर्धा जिल्हय़ातील आर्वी येथे ६ लाख रुपये किमतीचे सोयाबीन तेलाचे डबे, प्लास्टिक कॅन आणि पाऊच भरून पाठविण्यात आलेला ट्रक संबंधित दुकानदारापर्यंंत पोहोचलाच नसल्यामुळे तेल कंपनीच्या व्यवस्थापकाने दाखल केलेल्या तक्र ारीवरून बाळापूर पोलिसांनी ट्रकमालक आणि ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अकोला-बाळापूर मार्गावर असलेल्या अंबूजा सोयाबीन तेल कारखान्यातून ८ जुलै रोजी सोयाबीन तेलाचे पाऊच, प्लास्टिक कॅन आणि डबे मिळून एकूण ६ लाख रुपयांचा माल एम.एच.-४0, एन ३३८९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरून वर्धा जिल्हय़ातील आर्वी येथे पाठविण्यात आला; परंतु ११ जुलैपर्यंंत संबंधित दुकानदारापर्यंंत हा ट्रक पोहोचलाच नाही. त्यामुळे अंबूजा सोयाबीन तेल कारखान्याचे व्यवस्थापक अनिल जोशी यांनी बाळापूर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी बालाघाट येथील ट्रकमालक सुरेश लक्ष्मण हागे आणि ट्रकचालक मनोज क्षीरसागर यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४0७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून, ठाणेदार सुनील सोळंके यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.