भावाने उघडकीस आणले बहिणीचे प्रेमप्रकरण!

By Admin | Updated: February 12, 2016 02:13 IST2016-02-12T02:13:37+5:302016-02-12T02:13:37+5:30

प्रियकराची भावासह त्याच्या सहका-यास मारहाण; गुन्हा दाखल.

Sister's love affair with brother! | भावाने उघडकीस आणले बहिणीचे प्रेमप्रकरण!

भावाने उघडकीस आणले बहिणीचे प्रेमप्रकरण!

अकोला: ग्राहकांना पाण्याच्या कॅन पोहोचून देण्यासाठी सहकार्‍यासोबत निघालेल्या लहानग्या मुलाला कृषी विद्यापीठातील झाडाझुडपामध्ये जोडपे दिसून आले. त्याने उत्सुकतेपोटी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता, ती युवती त्याची बहीणच निघाली. लहानग्या भावाने व त्याच्या सहकार्‍याने, बहीण व तिच्या प्रियकराचा पाणउतारा केला असता, प्रियकराने दोघांनाही फायटरने मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. उमरी परिसरातील एका व्यक्तीचा मिनरल वॉटर विक्रीचा व्यवसाय आहे. या ठिकाणी अल्पवयीन मुलगा काम करतो. गुरुवारी दुपारी तो मुलगा मालकासोबत ग्राहकाकडे पाण्याच्या कॅन पोहोचविण्यासाठी गेला. कॅन पोहोचवून ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातून परतत होते. दरम्यान, लहान मुलाला परिसरातील झाडाझुडपांमध्ये जोडपे दिसले. जोडपे अश्लील वर्तन करीत होते. मुलाने कुतूहलापोटी जवळ जाऊन पाहिले असता, ती प्रेयसी त्याची बहीण असल्याचे दिसून आले. तिचे कृत्य पाहून लहानग्या भावाला चीड आली. त्याने तेथेच तिचा पाणउतारा करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत त्याचा सहकारीही तेथे आला. त्याने प्रियकरास जाब विचारला. प्रियकराने दोघांसोबत वाद घालत, दोघांनाही फायटरने मारहाण केली. यात प्रेयसीचा भाऊ व त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी मिनरल वॉटर व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, सिव्हिल लाइन पोलिसांनी प्रियकर उमेश सावरकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Sister's love affair with brother!