शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

अकोल्याच्या सुफीयानच्या  निर्णायक गोलमुळे सिंगापूरचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 6:58 PM

या सामन्यात दोन महत्त्वपूर्ण गोल सुफीयान याने करू न भारताला विजय मिळवून दिला.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या ४७ व्या शालेय आशियाई १८ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत अकोल्याचा सुफीयान शेख भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. सिंगापूरविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने ४-१ गोलने विजय मिळविला. या सामन्यात दोन महत्त्वपूर्ण गोल सुफीयान याने करू न भारताला विजय मिळवून दिला.सुफीयान हा अकोल्यातील पहिला फुटबॉलपटू ठरला, ज्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोन गोल करू न स्वर्णिम इतिहास रचला. सुफीयान लहानपणापासून लाल बहादूर शास्त्री क्रीडांगण येथे फुटबॉलचे धडे गिरवित होता. यानंतर क्रीडापीठ बालेवाडी पुणे येथे फुटबॉलचे धडे प्रशिक्षक धीरज मिश्रा यांच्याकडून प्राप्त केले. आज आशिया खंडात इंडोनेशिया येथे भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. सुफीयानला फुटबॉलचा वारसा आपल्या घराण्यातूनच मिळाला आहे. सुफीयानचे आजोबा शेख चांद अकोल्यातील पहिले संतोष ट्रॉफी प्लेअर आहेत. वडील शेख फहिम हे पोलीस विभागाचे स्टार फुटबॉलपटू आहेत. सुफीयानला मातुल घराण्यातूनही खेळाचा वारसा मिळाला आहे. मामा शेख हसन शेख अब्दुला पहिलवान आहेत. आजोबा शेख अब्दुला आणि शेख नजीर पहिलवान हे दोघेही विदर्भ केसरी आहेत. शेख सर्फराज हेसुद्धा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहेत. सुफीयानच्या आंतरराष्ट्रीय खेळीमुळे अकोला फुटबॉलला गतवैभव प्राप्त होण्याची आशा फुटबॉलप्रेमींमध्ये पल्लवित झाली आहे.१५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केल्या आहेत. भारतीय संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर सिहोर (मध्य प्रदेश) येथे झाले. शिबिरामध्ये देशभरातील ४० खेळाडू सहभागी झाले होते. यामधून २० खेळाडूंची निवड भारतीय संघात झाली. यामध्ये सुफीयान शेख हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे, हे येथे उल्लेखनीय.भारताला मिळाला नव्या ऊर्जाचा खेळाडूफुटबॉल १८ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिंगापूर संघाला अकोल्याच्या सुफीयान शेखच्या दोन गोलमुळे पराभवाचे तोंड पाहावे लागले. ही भारतासाठी आनंदाची बाब आहे; मात्र आज फिफा २०२२ फुटबॉल वर्ल्ड कप क्वॉालिफाय सामन्यात भारताच्या वरिष्ठ फुटबॉल संघाला ओमान संघाने १-० ने हरविले. यामुळे भारतीय संघ फुटबॉल वर्ल्ड कप २०२२ साठी पात्र होऊ शकला नाही; मात्र सुफीयानसारखे नव्या ऊर्जेचे फुटबॉलपटू भारतीय संघात गेल्यास भारतीय संघ निश्चितच वर्ल्ड कपकरिता पात्रता सिद्ध करेल, अशा प्रतिक्रिया फुटबॉलपटूंनी व्यक्त केल्या. 

 

टॅग्स :AkolaअकोलाFootballफुटबॉल