शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

अकोल्यात नाताळ सण साधेपणाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 1:47 PM

Christmas in Akola शहरातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्ह्यातील एकूण ३० चर्चेसमध्ये सकाळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात  आले होते.

ठळक मुद्दे रेव्ह. निलेश अघमकर यांनी पवित्र बायबल मधील वचनांच्या आधारे नाताळाचा संदेश दिला.रुणसंघ आणि महिला संघाच्या सदस्यांनी  खिस्तजन्माची गीते सादर केली.

अकोला:  शुक्रवार २५ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात प्रभू येशू खिस्तांचा जन्मदिवस खिसमस ( नाताळ) साजरा करण्यात आला.  त्यानिमित्त अकोला शहरातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्ह्यातील एकूण ३० चर्चेसमध्ये सकाळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात  आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अकोल्यात ही नाताळ सण साधेपणाने साजरा करण्यात आला. ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेविअर्स अलायन्स चर्च मध्ये रेव्ह. निलेश अघमकर यांनी पवित्र बायबल मधील वचनांच्या आधारे नाताळाचा संदेश दिला. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता प्रभू येशू यांच्या प्रेम, त्याग आणि स्नेहाच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू येशू हे अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी या जगात आले, त्यांनी जगाला प्रेम, शांती, स्नेह आणि त्यागाची शिकवण दिली, त्याचेच अनुकरण करण्याची गरज असल्याचे रेव्ह. अघमकर म्हणाले. 

गेल्या नोव्हेंबर महिन्यापासूनच सर्वत्र नाताळ सणाची तयारी सुरु झाली. नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या खिश्चन धर्मियांच्या ग़ृहसणापासूनच खरेतर नाताळाची तयारी सुरु होते. गृहसणाच्यावेळी सर्व खिश्चन कुटूंंबे आपापल्या घरांची स्वच्छता करतात. त्या काळात सर्व खिश्चन बधू भगिनी एकमेकांच्या घरी जावून प्रार्थना करतात आणि शुभेच्छा देतात. डिसेंबर महिना उजाडताच घरांना आणि चर्चेसना रंगरंगोटी देण्यास सुरुवात होते. पहिल्या पंधरवड्यातच नाताळासाठी कपड्यांची खरेदी,  सणासाठी फराळाची तयारी सुरु होते. २० तारखेलाच सर्च घरे आणि चर्चेसना रोषनाई केली जाते. त्यानंतर सलग चार दिवस घरोघरी फिरुन अबालवृद्ध खिस्तजन्माची गाणी म्हणतात. त्यामध्ये सांताक्लॉजचा वेश परिधान केलेला व्यक्ती सर्व लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. २४ डिसेंबरला रात्री १० ते १२ वाजेदरम्यान सर्व चर्चेसमधून प्रार्थना सभांचे आयोजन केले गेले. आज २५ डिसेंबर रोजी सर्व चर्चेसमधून सकाळी ९ वाजता प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व चर्चेसमधील धर्मगुरूंनी खिश्चनांचा पवित्र धर्मग्रंथ बायबलमधील वचनांच्या आधारे खिस्त जन्मावर संदेश दिला.   तरुणसंघ आणि महिला संघाच्या सदस्यांनी  खिस्तजन्माची गीते सादर केली.  प्रार्थनासभेनंतर सर्व खिस्ती बंधू भगिनी यांनी एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता सलग आठ दिवस सर्व चर्चेसमधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  अकोला शहरातील अलायन्स मिशन आणि इतर मिशनची असे एकूण ८ चर्चेस असून, नाताळानिमित्त त्या चर्चेसवर सुंदर रोषणाई करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरला पुन्हा रात्री क्यारोल पार्टी घरोघरी जावून नवीन वर्षाच्या स्वागताची गीते सादर करतील. १ जानेवारीला खिश्चन समाज नवीन वर्ष हादेखील सण साजरा करतो. अशाप्रकारे आठवडाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.

टॅग्स :ChristmasनाताळAkolaअकोला