वाशिम नगरपरिषदेच्या सर्वच पर्यवेक्षकांना ‘कारणे दाखवा’!
By Admin | Updated: January 20, 2016 01:58 IST2016-01-20T01:58:36+5:302016-01-20T01:58:36+5:30
भाडोत्री सफाई कामगार प्रकरणात येत्या दोन दिवसांत खुलासा सादर करण्याच्या सूचना.

वाशिम नगरपरिषदेच्या सर्वच पर्यवेक्षकांना ‘कारणे दाखवा’!
वाशिम : सरकारकडून गलेलठ्ठ पगार घ्यायचा, त्यापैकी अतिशय नगण्य रक्कम एखाद्या भाडोत्री व्यक्तीला देऊन त्यांच्याकडून स्वत:चे काम करून घेणार्या सफाई कामगारांबाबत १६ जानेवारी रोजी 'लोकमत'ने स्टिंग ऑपरेशन केले होते. यासंदर्भात शहरात असलेल्या आरोग्य विभागातील सर्वच्या सर्व पर्यवेक्षकांना (जमादार) नगरपरिषदेच्यावतीने १९ जानेवारी रोजी सकाळी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत शहराच्या स्वच्छतेसाठी असलेल्या सफाई कामगारांनी स्वत: कामावर न जाता त्यांच्या जागी भाडोत्री व्यक्तींची नेमणूक केली असल्याचे ह्यलोकमतह्णने १६ जानेवारी रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणाच्या चौकशीस प्रारंभ झाला असून, संबधित अधिकार्यांच्यावतीने माहिती संकलित करणे सुरू झाले आहे. यासंदर्भात शहरातील नरेंद्र नागपूरकर, बबन भांदुर्गे, दशरथ मोहळे, लक्ष्मण बढे, सुनील कनोसे, लाला मांजरे या सर्व सहा पर्यवेक्षकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली तसेच या प्रकरणात येत्या दोन दिवसांत खुलासा सादर करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक जितू बढेल यांनी दिली. सदर प्रकरण गंभीर असल्याने नगरपरिषदेचे उपाध्यक्ष मो. जावेद हाजी मो. हारुण यांनी ताबडतोब दखल घेत आरोग्य विभागाला धारेवर धरले तसेच यासंदर्भात १९ जानेवारी रोजी शहरातील सर्व सफाई कामगारांच्या पर्यवेक्षकांना बोलावून त्यांची बैठक घेतली.
बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा केल्यानंतर या प्रकरणात कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना केल्यात. यावेळी आरोग्य निरीक्षक आर.एस. महाले, स्वच्छता निरीक्षक जितू बढेल, पर्यवेक्षक नरेंद्र नागपूरकर, बबन भांदुर्गे, दशरथ मोहळे, लक्ष्मण बढे, सुनिल कनोसे, लाला मांजरे यांच्यासह कर्मचार्यांची उपस्थिती होती. वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांनीसुद्धा प्रकरण गांभीर्याने घेतल्याने आरोग्य विभागातील अनेक अधिकारी, पर्यवेक्षकासह सफाई कर्मचार्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.