शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

घरकुलाच्या अकुशल कामासाठी निधीचा तुटवडा; तीन महिन्यांपासून मजुरीची रक्कम देण्यात खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 13:58 IST

अकोला : ग्रामीण भागातील गृहनिर्माण योजनेच्या कामांसाठी ९० ते ९५ दिवसांची मजुरी लाभार्थीला देण्यात प्रचंड अडचणी आहेत. पंचायत समित्यांमध्ये अकुशल मजुरांचे हजेरीपत्रक दिल्यानंतरही दोन ते तीन महिने मजुरीच अदा होत नसल्याची परिस्थिती आहे.

ठळक मुद्देमहात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ९० ते ९५ दिवसांच्या अकुशल कामाची मजुरी दिली जाते. घरकुलाचा दुसरा आणि तिसरा हप्ताही अडकत असल्याने जिल्ह्यातील हजारो लाभार्थी कमालीचे वेठीस धरले जात आहेत.अकुशल मजुरांचे हजेरीपत्रक दिल्यानंतरही दोन ते तीन महिने मजुरीच अदा होत नसल्याची परिस्थिती आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : ग्रामीण भागातील गृहनिर्माण योजनेच्या कामांसाठी ९० ते ९५ दिवसांची मजुरी लाभार्थीला देण्यात प्रचंड अडचणी आहेत. पंचायत समित्यांमध्ये अकुशल मजुरांचे हजेरीपत्रक दिल्यानंतरही दोन ते तीन महिने मजुरीच अदा होत नसल्याची परिस्थिती आहे. त्यातच घरकुलाचा दुसरा आणि तिसरा हप्ताही अडकत असल्याने जिल्ह्यातील हजारो लाभार्थी कमालीचे वेठीस धरले जात आहेत.‘सर्वांनाच घरे’ या संकल्पनेनुसार ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थींसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली आहे. योजनेसाठी २०११ मध्ये झालेल्या आर्थिक, सामाजिक, जातीनिहाय सर्वेक्षणातून लाभार्थींची संख्या निश्चित झाली आहे. जिल्ह्यात एकूण ६७ हजार लाभार्थी पात्र आहेत. चालू वर्षात जिल्ह्यात ८,४२६ घरकुलांचा लक्ष्यांक आहे. जातीनिहाय सर्व्हेक्षणातील प्रपत्र ‘ब’ मध्ये शासनाने घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी यादी आधीच तयार केली आहे. त्या लाभार्थींची नावे आॅनलाइन करून त्यांना अनुदान वाटप करण्यातही प्रचंड अडचणी आल्या. त्याशिवाय, ज्या लाभार्थींनी घरकुलांची कामे सुरू केली. त्यांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ९० ते ९५ दिवसांच्या अकुशल कामाची मजुरी दिली जाते. त्यासाठी मजुरांचे हजेरीपत्रक ग्रामरोजगार सेवकाकडून सादर केली जातात. त्यानंतर मनरेगा अंतर्गत कामांसाठी वापरल्या जाणाºया हजेरी पत्रकांच्या नोंदी पालक तांत्रिक अधिकाºयांऐवजी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांकडे देण्यात आल्या. मजुरी अदा करण्याला होणारा विलंब टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला. मात्र, त्याउलट लाभार्थींना वेठीस धरण्याचा प्रकार घडत आहे.

- ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांची शाळादरम्यान, या कामांसाठी हजेरी पत्रकांसह इतर नोंदीसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंते प्रत्यक्ष लाभार्थींच्या घरी भेट देतात. त्यावेळी लाभार्थींना थेट पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्यांमध्ये सुरू आहेत. काहींनी तर लाभार्थींकडून दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम उकळल्याचीही उदाहरणे आहेत. ती न दिल्यास हजेरीपत्रक न भरणे, इतर नोंदीमध्ये त्रुटी ठेवून हप्ता, रोहयोची मजुरी निघण्यास विलंब करण्याची भीतीही त्यांच्याकडून दाखवली जात आहे.

- काही पंचायत समित्यांनी मजुरीचा पर्यायच खोडलाजिल्ह्यातील काही पंचायत समितीमध्ये घरकुल लाभार्थींना रोजगार हमी योजनेतून मजुरीची रक्कम हवी असल्यास घरकुलाचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळण्यास विलंब होतो, असे लाभार्थींना सांगत त्यांना मजुरीची रक्कम घेण्यापासूनच परावृत्त केल्याची माहिती आहे. त्यातून लाभार्थींचे १६ हजार रुपयांचे नुकसानही करण्यात आले.

- राज्य स्तरावरून ‘नो सफिशियंट फंड’चा मेसेजजिल्ह्यातील लाभार्थींची मजूर हजेरीपत्रके आॅनलाइन अपलोड केल्यानंतर मजुरांच्या खात्यात तेथूनच रक्कम जमा केली जाते. मात्र, अनेक लाभार्थींच्या मजूर पत्रके सादर केल्यानंतर त्यांची रक्कम अदा झाल्याच्या रकान्यात ‘नो सफिशियंट फंड’ असा शेरा आढळून येतो. अशाप्रकारे तीन-तीन महिन्यांपासून मजुरीची रक्कम रखडल्याची हजारो उदाहरणे आहेत.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय