शिक्षकांसाठी आता शॉर्ट मेसेज सिस्टिम!

By Admin | Updated: December 12, 2014 00:25 IST2014-12-12T00:25:08+5:302014-12-12T00:25:08+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांसाठी शासनाचा उपक्रम.

Short message system for teachers now! | शिक्षकांसाठी आता शॉर्ट मेसेज सिस्टिम!

शिक्षकांसाठी आता शॉर्ट मेसेज सिस्टिम!

अकोला : शैक्षणिक विषयाशी निगडीत सूचना शिक्षकांना त्वरित आणि सहज देता याव्या व नवीन शैक्षणिक धोरण प्रभाविपणे राबविता यावे, यासाठी 'शॉर्ट मेसेज सिस्टिम' सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांसाठी ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार आहे.
शासनाने नवीन शैक्षणिक धोरण आखले. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर सुरू आहे. त्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे शैक्षणिक धोरण शिक्षकांच्या गळी उतरविले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांपर्यंतही हे धोरण प्रभावीपणे पोहोचावे, यासाठी बीएसएनएलच्या माध्यमातून शॉर्ट मेसेज सिस्टिम उपलब्ध केली जाणार आहे. या सिस्टिमच्या मदतीने मोबाइल फोनने संबंधित शिक्षकांना वेळोवेळी संदेश पाठवून शैक्षणिक कामकाजाबाबत सूचना व निर्देश देण्यात येतील. या सिस्टिममध्ये एकाच वेळी राज्यभरातील सर्व स्थानिक संस्थांच्या शिक्षकांना शैक्षणिक संदेश पाठवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष करुन ऑनलाइन संच मान्यतेसाठी ही सिस्टिम उपयोगी ठरणार आहे. शॉर्ट मेसेज सिस्टिम योजना अमलात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर एनआयसी, पूणे यांच्यामार्फत काम सुरु करण्यात आले आहे.

Web Title: Short message system for teachers now!