धक्कादायक : जन्मदात्या पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मोझरी खुर्द येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:40 IST2018-01-22T23:40:27+5:302018-01-22T23:40:51+5:30
पिंजर (अकोला): जन्मदात्या पित्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २२ जानेवारी रोजी मोझरी खुर्द येथे उघडकीस आली. या प्रकरणी पिंजर पोलिसांनी नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.

धक्कादायक : जन्मदात्या पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मोझरी खुर्द येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंजर (अकोला): जन्मदात्या पित्यानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २२ जानेवारी रोजी मोझरी खुर्द येथे उघडकीस आली. या प्रकरणी पिंजर पोलिसांनी नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.
मोझरी खुर्द येथील अल्पवयीन मुलीस तिचे वडील मारहाण करीत असल्याची माहिती काही ग्रामस्थांनी पिंजर पोलिसांना सोमवारी दिली. या माहितीच्या आधारे पिंजर पोलिसांचे पथक मोझरी खुर्द येथे गेले होते. त्यांनी सदर पीडित मुलीला विश्वासात घेऊन माहिती घेतली असता गेल्या पंधरा दिवसांपासून पिता लैंगिक छळ करीत असल्याची धक्कादायक माहिती दिली. सदर मुलीच्या तक्रारीवरून पिंजर पोलिसांनी नराधम पित्याविरुद्ध कलम ३७६, ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय वासाडे करीत आहेत.