महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीचा शॉक लागून मृत्यू

By Admin | Updated: July 13, 2017 20:17 IST2017-07-13T20:17:55+5:302017-07-13T20:17:55+5:30

पातूर : स्थानिक पोलीस ठाण्यातील क्वार्टरमध्ये बाळापूर येथून बदली होऊन पातूर येथे आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीला १३ जुलैच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.

Shock of a woman police officer's husband dies | महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीचा शॉक लागून मृत्यू

महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीचा शॉक लागून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
पातूर : स्थानिक पोलीस ठाण्यातील क्वार्टरमध्ये बाळापूर येथून बदली होऊन पातूर येथे आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीला १३ जुलैच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.
बाळापूर येथून महिला पोलीस कर्मचारी सखुबाई खडसे यांची पातूर येथे बदली झाल्यानंतर त्यांनी १३ जुलै रोजी त्यांचे घरगुती सामान पातूर येथे आणले. त्यांचे पती सुमेध आत्माराम गुडदे हे घरातील विद्युत पुरवठा व्यवस्थेची पाहणी करीत असताना विद्युत केबलला हात लागताच विद्युत प्रवाहचा जबर धक्का लागला.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर शासकीय रुग्णावाहिका बोलविण्यात आली. मात्र, अकोला येथे नेत असताना चिखलगाव ते कापशीचे दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे. हे वृत्त लिहिपर्यंत पातूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत कसलीही नोंद करण्यात आली नव्हती.

Web Title: Shock of a woman police officer's husband dies