शिवशाहीचे ब्रेक फेल, पेट्रोल पंपाच्या आवार भिंतीला धडकली!

By Atul.jaiswal | Updated: December 19, 2024 18:09 IST2024-12-19T18:08:38+5:302024-12-19T18:09:10+5:30

चालकाच्या प्रसंगावधानने टळला अनर्थ : अशोक वाटीका चौकातील थरार

Shivshahi's brakes failed, it hit the wall of the petrol pump in akola | शिवशाहीचे ब्रेक फेल, पेट्रोल पंपाच्या आवार भिंतीला धडकली!

शिवशाहीचे ब्रेक फेल, पेट्रोल पंपाच्या आवार भिंतीला धडकली!

अकोला : अमरातीकडून येणारी शिवशाही बस वेगाने अकोश वाटीका चौकात येते व थेट पेट्रोल पंपाच्या भींतीवर जाऊन धडकते. घटना पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडतो व घटनास्थळी एकच खळबळ उडते. ही थरारक घटना अकोला शहरातील अशोक वाटीका चौकात गुरुवारी (१९ डिसेंबर) दुपारी चार वाजताचे सुमारास घडली. बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्यावर चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

अकोला क्र. २ आगाराची अमरावती-अकोला शिवशाही बस (एमएच ०६ बीडब्न्ल्यू ४३१६) अमरावती येथून काही प्रवासी घेऊन अकोल्यात पोहोचली. बोरगाव मंजू व शिवणी येथे बसमधील प्रवासी उतरल्यानंतर रिकामी बस अकोला मध्यवर्ती बसस्थानकाकडे येत असताना नेहरु चौकात बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालक मनोज तायडे यांच्या लक्षात आले. त्यांनी गिअरद्वारे वेगावर नियंत्रण मिळवत अशोक वाटीका चौकापर्यंत आणली. या ठिकाणी रेड सिग्नल असल्यामुळे अनेक वाहने थांबलेली असल्याचे पाहताच चालकाने प्रसंगावधान दाखवत आपली बस पेट्रोल पंपाच्या दिशेने घेत आवारभींतीवर धडकवली. त्यामुळे बस जागीच थांबली व पुढील अनर्थ टळला.

...तर अनेक जण चिरडले गेले असते
ब्रेक निकामी झालेली शिवशाही बस नेहरु पार्क चौकातून अशोक वाटीका चौकात आली तेव्हा उड्डाणपुलाखालील सिग्नल लाल होता. वर्दळीच्या असलेल्या या चौकात अनेक वाहने सिग्नल हिरवा होण्याच्या प्रतीक्षेत थांबलेली होती. शिवशाही बसच्या चालकाने प्रसंगावधान दाखवून बस पेट्रोल पंपाच्या भींतीवर धडकवली नसती तर ती सरळ चौकात जाऊन तेथे उभ्या असलेल्या वाहनचालकांना चिरडत पुढे गेली असती.

बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मी बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु पॅडल ब्रेक आतमध्ये गेल्याचे दिसले. बस थांबविण्यासाठी मी गीअर कंट्रोल करत वेग कमी केला व पेट्रेाल पंपाच्या भींतीवर बस नेली. तसे केले नसते तर चौकात उभे असलेले अनेक जण चिरडले गेले असते.
- मनोज तायडे, अपघातग्रस्त शिवशाही बसचालक

Web Title: Shivshahi's brakes failed, it hit the wall of the petrol pump in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.