महायुतीमध्ये शिवसंग्रामचा १२ जागांवर दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 19:05 IST2019-08-02T19:05:08+5:302019-08-02T19:05:13+5:30

राज्यातील १२ विधानसभा मतदारसंघात आम्ही तयारी सुरू केली आहे असा दावा शिवसंग्रामचे राष्टÑीय अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला.

Shivsangram to contest 12 seats in assembly election | महायुतीमध्ये शिवसंग्रामचा १२ जागांवर दावा

महायुतीमध्ये शिवसंग्रामचा १२ जागांवर दावा

अकोला : महायुतीचा घटक पक्ष म्हणून गेल पाच वर्षात शिवसंग्राम ने प्रामाणिकपणे साथ दिली आहे . आगामी निवडणुकीतही महायुतीमध्येच आम्ही निवडणुक लढविणार असून राज्यातील १२ विधानसभा मतदारसंघात आम्ही तयारी सुरू केली आहे असा दावा शिवसंग्रामचे राष्टÑीय अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला.
पश्चीम वºहाडाच्या दौऱ्यावर आलेल्या मेटे यांनी शुक्रवारी अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शिवसंग्रामने घेतलेल्या सामजीक भूमिकेची मुख्यमंत्र्यांनी स्वागत करून आमच्या सामाजीक मागण्यांची पुर्तता केली असली तरी राजकीय आश्वासने पुणे करण्यास ते असमर्थ ठरले मात्र त्याबद्दल आमच्या मनात कोणताही रोष नाही, येणाºया विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत आगामी निवडणुक महायुतीमध्येच लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री शिवसंग्रामच्या १२ जागांच्या मागणीचा नक्कीच सकारात्मक विचार करून न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Shivsangram to contest 12 seats in assembly election