शिरपूरची हळद, केळीची वाहवा!

By Admin | Updated: December 12, 2014 23:58 IST2014-12-12T23:58:01+5:302014-12-12T23:58:01+5:30

भरघोस नफा, वाशिम जिल्ह्यातील युवा शेतक-याचा गौरव.

Shirpur's banal, banana praises! | शिरपूरची हळद, केळीची वाहवा!

शिरपूरची हळद, केळीची वाहवा!

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील शिरपूरजैन येथील एकरी ३0 क्विंटल उत्पादन देणारी हळद आणि भरघोस नफा देणार्‍या केळीची राष्टीय स्तरावर वाहवा झाली आहे. नागपूर येथे पार पडलेल्या ह्यअँग्रोव्हिजनह्ण या राष्ट्रीय स्तरावरील कृषी प्रदर्शनीत या दोन्ही उत्पादनांची प्रशंसा झाली.
कृषी क्षेत्रात नाविण्यपूर्ण प्रयोग करून भरघोस उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांनी नागपूर येथील ४ ते ७ डिसेंबर दरम्यानच्या अँग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनात सहभाग नोंदविला. यावेळी शिरपूरजैन येथील युवा शेतकरी सचिन सारडा यांनीदेखील हळद व केळीच्या उत्पादनाची माहिती दिली. पारंपरिक शेतीला फाटा देऊन त्यांनी नवीन तंत्रज्ञानाने शेती केली. त्यांनी शेतीमध्ये हळद व केळीची बाग फुलवली. ठिबक सिंचनाचा वापर करून प्रायोगिक तत्त्वावर एका एकरमध्ये हळद व केळीची लागवड केली. हळदीचे एकरी उत्पादन ३0 क्विंटल येऊन, त्यांना जवळपास एक लाख ८0 हजाराचे उत्पन्न मिळाले. लागवड व संगोपन खर्च ६0 हजार रुपये येऊन, निव्वळ नफा एक लाख २0 हजार रुपये मिळाला. त्यांनी एका एकरात केळीची दोन हजार झाडे लावली. यातून तीन लाख ४0 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. लागवड खर्च ६५ हजार रुपये वगळला, तर दोन लाख ८५ हजाराचा निव्वळ नफा त्यांना झाला. सचिन सारडा यांनी त्यांची ही यशोगाथा मांडल्यानंतर कृषी प्रदर्शनात सर्वांनीच प्रशंसा केली. मानचिन्ह देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला. शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीचीच झालेली असताना, आधुनिक शेतीची कास धरल्यास चांगला नफा मिळू शकतो, हेच सचिन सारडा यांनी दाखवून दिले आहे.

Web Title: Shirpur's banal, banana praises!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.