राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत शेगावकर तृतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:15 IST2021-01-09T04:15:28+5:302021-01-09T04:15:28+5:30

अकाेला : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने आयाेजित ‘सिद्धार्थ गौतम बुद्ध : जीवन ...

Shegavkar third in the state level essay competition | राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत शेगावकर तृतीय

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत शेगावकर तृतीय

अकाेला : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने आयाेजित ‘सिद्धार्थ गौतम बुद्ध : जीवन व कार्य’ या विषयावरील राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल घाेषित झाला असून, येथील निवृत्त आयएएस अधिकारी विश्वनाथ शेगावकर यांच्या निबंधाला तृतीय क्रमांकाचा बहुमान मिळाला. तृतीय क्रमांकाचे प्रारितोषिक विश्वनाथ शेगावकर, अकाेला, कल्याण श्रावस्ती, साेलापूर, शुभांगी कुंभार, सातारा, देवकुमार मेश्राम, गाेंदिया यांना विभागून देण्यात आले. प्रथम क्रमांक नाशिकचे डाॅ. अमाेल लाेंढे यांनी तर द्वितीय क्रमांक चंद्रपूरचे प्रा. ए. एस. मेश्राम यांनी मिळवला. विशेष उत्तेजनार्थमध्ये कल्पना डवले, यवतमाळ, संजय बनसोडे, चंदीगड, ऋतुजा उगले, बुलडाणा यांचा तर उत्तेजनार्थमध्ये अकाेल्याचे नाना किरतकर, वर्धा येथील लाेककला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पुष्पा तायडे यांच्यासह विजेत्यांचा समावेश आहे.

Web Title: Shegavkar third in the state level essay competition