शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

शंकराचार्य स्वामी निश्चलानंद २६ डिसेंबर रोजी अकोल्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 2:21 PM

अकोला: जगन्नाथपुरी येथील पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांचे सहा शिष्यांसह २६ डिसेंबर रोजी राजेश्वर नगरीत प्रथमच आगमन होत आहे.

अकोला: जगन्नाथपुरी येथील पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांचे सहा शिष्यांसह राजेश्वर नगरीत प्रथमच आगमन होत आहे. श्री जगद्गुरू शंकराचार्य स्वागत समिती व खंडेलवाल चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने या आगमनानिमित्त आशीर्वचन व संगोष्ठी सोहळ्याचे आयोजन केले असल्याची माहिती शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गोपाल खंडेलवाल, सचिन लटुरिया व प्रा. विवेक बिडवई यांनी दिली.अकोला मुक्कामात जगद्गुरू शंकराचार्य यांचे शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. २६ डिसेंबर रोजी शंकराचार्य यांचे भोपाळ येथून रेल्वेने अकोल्यात आगमन होणार आहे. त्यांचा मुक्काम दत्त कॉलनी येथे राहणार आहे. २७ डिसेंबर रोजी आशीर्वचन सोहळा होईल. या कार्यक्रमात श्रीमद गोवर्धनमठ पुरी पिठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज भाविकांना ज्ञान-विज्ञान-धर्म यावर मार्गदर्शन करणार आहेत. २७ डिसेंबर रोजी आमंत्रित भाविकांसाठी संगोष्ठी कार्यक्रम होणार असून, ‘बदलत्या सामाजिक परिवेशात धर्माचरणाचे स्वरू प’ या विषयावर मार्गदर्शन करतील, तसेच आदर्श गोसेवा प्रकल्प म्हैसपूर येथे भेट देतील. २८ डिसेंबर रोजी नागरिक व भक्तांना दर्शन व आशीर्वाद सोहळा होईल. तीन दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जगद्गुरू शंकराचार्य स्वागत समिती, खंडेलवाल चॅरिटेबल ट्रस्ट, रुद्र सप्तशती मंडळ जठारपेठ, गीता स्वाध्याय मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ता प्रयत्नशील आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

 

टॅग्स :Akolaअकोला