शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

शालेय उपयोगी माहितीसाठी आता शगुन पोर्टल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 2:16 PM

अकोला : राज्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक योजना, शाळांची, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, यासोबतच विविध शालेय उपयोगी उपक्रमांची माहिती अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने शगुन (शाळा गुणवत्ता) नावाचे शैक्षणिक आॅनलाइन पोर्टल तयार केले आहे.

ठळक मुद्देकेंद्र शासनाचे आॅनलाइन पोर्टल शैक्षणिक योजना, शाळांच्या गुणवत्तेसह उपक्रमांची द्यावी लागणार माहिती

अकोला : राज्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक योजना, शाळांची, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, यासोबतच विविध शालेय उपयोगी उपक्रमांची माहिती अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने शगुन (शाळा गुणवत्ता) नावाचे शैक्षणिक आॅनलाइन पोर्टल तयार केले आहे.शा म्हणजे शाळा व गुन म्हणजे गुणवत्ता याचेच एकत्रीकरण करून शगुन नावाचे पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलमध्ये राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम, इतर राज्यांच्या शैक्षणिक यशोगाथा आणि जनतेला शैक्षणिक घडामोडींची माहिती व्हावी आणि या माहितीचा इतर राज्यांमधील शाळांना उपयोग व्हावा, या उद्देशाने हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. शासनाने सर्व शिक्षा अभियान २०१७ व १८ च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक निर्मितीच्या अनुषंगाने राज्यात घडत असलेल्या प्रेरक बाबी आणि यशोगाथा व राज्याची वार्षिक कार्य योजना शगुन पोर्टलवर टाकण्याचे निर्देश दिले होते. काही राज्यांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या अनेक पद्धतीचा वापर करून शालेय शिक्षण परिसर व शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यावर भर देण्यात येतो. या पोर्टलवर सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्याची उपक्रमनिहाय निधीबाबतची माहिती, भौतिक, आर्थिक उद्दिष्ट व निधीच्या उपाययोजनेची माहिती, तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील तालुकानिहाय, शाळानिहाय उपक्रमांची माहिती द्यायची आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून जिल्हा, तालुका स्तरावर राबविण्यात आलेल्या यशस्वी उपक्रम, यशोगाथांचे व्हिडिओ शगुन पोर्टलवर टाकण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. हे व्हिडिओ इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असावेत, तसेच पीएसएम, गणवेश वितरण पाठ्यपुस्तक वितरण, शाळा भेटी, ज्ञानरचनावाद पद्धतीचे शिक्षण, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे प्रशिक्षण, बैठक, प्रगत शाळा भेटी, शिक्षकांचे प्रशिक्षण, मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम, स्वरक्षणाचे धडे, क्रीडा स्पर्धा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम शगुन पोर्टल टाकण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर बोलक्या भिंती, डिजिटल शाळा, मुलांच्या गैरहजेरीचे प्रमाण, शिक्षणाची रुची, शाळा प्रवेशोत्सव, पटनोंदणी, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, विज्ञान, गणित कट्टा आदींची माहितीसुद्धा शिक्षकांना शगुनवर टाकावी लागणार आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानाचे काम करणाºया सहायक कार्यक्रम अधिकाºयांची नोडल अधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. शगुन पोर्टलवर माहितीबाबतचा आढावा प्रत्येक सोमवारी घेण्यात येईल. (प्रतिनिधी)

टॅग्स :Schoolशाळा