शाब्बास अकाेलेकर शिस्त पाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:13 IST2021-02-22T04:13:04+5:302021-02-22T04:13:04+5:30

अकोला : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमण टाळण्याच्या उद्देशाने रविवारी पुन्हा एकदा संपूर्ण संचारबंदी लावण्यात आली हाेती. या संचारबंदीला नागरिकांनी ...

Shabbas Akalekar followed the discipline | शाब्बास अकाेलेकर शिस्त पाळली

शाब्बास अकाेलेकर शिस्त पाळली

अकोला : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमण टाळण्याच्या उद्देशाने रविवारी पुन्हा एकदा संपूर्ण संचारबंदी लावण्यात आली हाेती. या संचारबंदीला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जिल्हाभरात प्रतिसाद दिला. काेणीही नाहक रस्तावर उतरले नाही त्यामुळे पाेलिसांना बळाचा वापर करण्याची गरजच पडली नाही

संचारबंदीच्या पार्शवभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. ऑटो, सिटी बस सेवा बंद असल्याने रुग्णांसह अडकलेल्या प्रवाशांना घरापर्यंत पोहोचवून देण्याचे कामही पोलिसांनी केले. शहरातील खानावळी, हॉटेल्स, सुपर शॉपीही बंद होत्या. जनता बाजारातील भाजी बाजार, जुना भाजी बाजार, धान्य बाजार, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही सर्वच प्रतिष्ठाने बंद होती. वृत्तपत्र, दूध विक्रेत्यांनी नेहमीप्रमाणे कामकाज केले. सकाळी काही तासांसाठी दूध, वृत्तपत्रे वितरणासाठी सवलत देण्यात आली हाेती. त्याच वेळेत ही कामे पूर्ण करण्यात आली विशेष म्हणजे औषधी दुकानेही माेठ्या प्रमाणात बंद हाेती.

ग्रामीण भागातही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. तालुका मुख्यालयासह मोठी गावे व रविवारचे बाजारही कुठेही भरले नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याच ठप्प झाला होता.

Web Title: Shabbas Akalekar followed the discipline