अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलीने दिला बाळास जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 15:42 IST2019-07-02T15:42:27+5:302019-07-02T15:42:55+5:30
अकोला: पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव हांडे येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तब्बल एक वर्षानंतर तक्रार झाल्यानंतर एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलीने दिला बाळास जन्म
अकोला: पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव हांडे येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तब्बल एक वर्षानंतर तक्रार झाल्यानंतर एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत गिरे असे आरोपीचे नाव असून, या अत्याचारातच पीडित मुलीने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची माहिती आहे.
पिंपळगाव हांडे येथील रहिवासी वसंत गिरे याने याच गावातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमजाळ्यात अडकवित तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या लैंगिक शोषणामध्येच मुलगी गर्भवती राहिली. तिने एका मुलाला जन्मही दिला; मात्र आरोपीने त्यांना पोलिसात तक्रार करू दिली नाही. या प्रकरणावरून एक वर्ष उलटले; मात्र आरोपीच त्यांना धमकावत असल्याने मुलीच्या आईने २९ जून रोजी पिंजर पोलीस ठाण्यात या अत्याचार प्रकरणाची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी वसंत गिरे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ तसेच पोक्सो कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.