sexual expoloitation of minor girl, acused arested | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अटकेत

अकोला : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्यासोबतच शारिरीक संबंध प्रस्थापित करून तीच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलीची तबेत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या तपासणीत ती पीडिता गर्भवती असल्याचे आढळून आले. यावरून पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आरोपी अटकही करण्यात आली. तर न्यायालयाने या आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांना जिल्हा स्त्री रुग्णालयातून त्यांच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक अल्पवयीन मुलगी गर्भवती असून तीला स्त्री रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार एक १५ वर्षीय पीडिता गर्भवती असून, ती माहिती लपवित आहे. या माहितीवरून पोलिसांनी रुग्णालय गाठून पीडितेस विश्वास घेऊन तिचे बयाण घेतले. पीडितेने दिलेल्या बयानानुसार तीला सोपान इंगळे नावाच्या युवकाने प्रेमसंबंधाचे आमीष देउन तीच्यावर अत्याचार केले. यातूनच आरोपीने पीडितेसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यामध्ये ती गर्भवती राहील्यानंतर आरोपीने तीला टाळाटाळ केली. त्यामुळे मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, पोस्को कलम अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. त्यानंतर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे.

 

Web Title: sexual expoloitation of minor girl, acused arested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.