प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 14:24 IST2020-01-10T14:24:28+5:302020-01-10T14:24:36+5:30

नागपूर येथे राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला लग्नाचे आमिष दाखविले.

Sexual abuse of a minor girl by falling into the trap of love! | प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार!

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार!

अकोला: नागपूर येथील एका १७ वर्षीय मुलाने अकोल्यातील १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला नागपूरला पळवून नेत, तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला. यातून मुलीला दोन महिन्यांची गर्भधारणा झाली. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची १७ वर्षीय मुलगी त्यांच्याकडे राहते. ती तिच्या आईकडे नागपूरला गेल्यावर नागपूर येथे राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला लग्नाचे आमिष दाखविले. मुलगी अकोल्यात आल्यानंतर काही दिवसांनी हा मुलगासुद्धा अकोल्यात आला. त्याने मुलीला फूस लावून नागपूरला पळवून नेले. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी त्याविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्या मुलाने नागपूर, अकोला येथे अनेकदा मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे आणि मुलीला गर्भधारणा झाल्याचे स्पष्ट झाले. रामदासपेठ पोलिसांनी नागपूर येथून त्या मुलाला ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. ही कारवाई ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय संगीता रंधे, पीएसआय मडावी, पोलीस कर्मचारी संदीप तांदुळकर व राजेश इंगळे यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Sexual abuse of a minor girl by falling into the trap of love!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.