शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आलिशान बंगल्यात सुरु होता देहविक्रय अड्डा; विद्यार्थीनी पकडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:41 IST

अकोला : मोठ्या उमरीतील प्रतिष्ठित नागरिकांची वस्ती असलेल्या इंजिनिअरिंग कॉलनीत एका आलिशान बंगल्यामध्ये सुरू असलेल्या देहविक्रय अड्ड्यावर जुने शहरचे ठाणेदार अन्वर शेख यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री उशिरा छापा टाकल्यानंतर अकोल्यातील सर्वांत मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला.

ठळक मुद्देया ठिकाणावरून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची एक विद्यार्थिनी रंगेहात पकडण्यात आली.शहरातील मोठ्या महाविद्यालयांच्या विद्यार्थिनींची ये-जा असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.अड्डा चालविणाºया महिलेविरु द्ध पीटा अ‍ॅक्टच्या कलम ४, ५ आणि ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

- सचिन राऊतअकोला : मोठ्या उमरीतील प्रतिष्ठित नागरिकांची वस्ती असलेल्या इंजिनिअरिंग कॉलनीत एका आलिशान बंगल्यामध्ये सुरू असलेल्या देहविक्रय अड्ड्यावर जुने शहरचे ठाणेदार अन्वर शेख यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री उशिरा छापा टाकल्यानंतर अकोल्यातील सर्वांत मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. या ठिकाणावरून एक विद्यार्थिनी रंगेहात पकडण्यात आली. या अड्ड्यावरून परिचारिका प्रशिक्षण विद्यालय आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थिनी, शहरातील मोठ्या महाविद्यालयांच्या विद्यार्थिनींची ये-जा असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.इंजिनिअरिंग कॉलनीतील ४५ वर्षीय महिलेच्या घरात हायप्रोफाईल देहविक्रय अड्डा सुरू असल्याच्या तक्रारी गत सहा महिन्यांपूर्वी पोलिसात करण्यात आल्या होत्या. यावर तत्कालीन ठाणेदार अन्वर शेख यांनी वॉच ठेवून छापा मारण्याची तयारीही केली होती; याची कुणकुण महिलेला लागताच तिने हा गोरखधंदा बंद केला. त्यानंतर या अड्ड्यावर सहा महिन्यांपासून पाळत ठेवली होती. देहविक्रय सुरू होताच पोलिसांनी शनिवारी रात्री एक बनावट ग्राहक तयार क रून त्याला या अलीशान बंगल्यात पाठविले. अड्डा चालविणाºया महिलेने ग्राहकाला काही मुलींचे छायाचित्र दाखविले. ग्राहकाने यातील पीकेव्हीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीची निवड केली. क्षणातच म्हणजेच शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास ही विद्यार्थिनी ग्राहकासमोर पेश केली. ही माहिती प्राप्त होताच परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख, जुने शहरचे ठाणेदार अन्वर शेख यांनी छापा टाकला.त्यावेळी विद्यार्थींनी बेडरू म सापडली. बनावट ग्राहक हा पोलिसांनीच पाठवलेला असल्याने या अड्ड्याची पूर्ण माहिती पोलिसांना मिळाली.छापा टाकताच पोलिसांनी बंगल्यातील तीनही बेडरूममध्ये तपासणी करीत असताना पोलिसांना हुलकावणी देत मागच्या रस्त्याने दोन ग्राहक व मुली फरार होण्यात यशस्वी झाल्या, तर पीकेव्हीची २० वर्षीय विद्यार्थिनी पोलिसांनी रंगेहात पकडली.पोलिसांनी देहविक्रय अड्डा चालविणाºया महिलेची कसून चौकशी केली असता तिने या अड्ड्यावर बडे अधिकारी तर त्यांच्यासाठी पीकेव्ही, परिचारिका महाविद्यालय, एमपीएससी व यूपीएससीच्या शिकवणी वर्गासाठी असलेल्या विद्यार्थिनीसह वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी येथे येत असल्याची माहिती दिली. यावरून सदर अड्ड्यावर अकोल्यातील मोठ्या महाविद्यालयांच्या विद्यार्थिनींची ये-जा असून, यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची संख्या अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अड्ड्याचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी अड्डा चालविणाºया महिलेविरु द्ध पीटा अ‍ॅक्टच्या कलम ४, ५ आणि ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.परिसरातील बंगले पडले ओस!ही महिला मोठ्या प्रमाणात सेक्स रॅकेट चालवित असल्याच्या तक्रारी केल्यानंतरही पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्याने या परिसरात नागरिकांनी लाखो रुपये खर्चून उभारलेले बंगले सोडून दिले होते. यामध्ये तब्बल नऊ मोठे आणि आलिशान बंगले ओस पडले असून, कोट्ट्यवधी रुपयांची मालमत्ता खाली पडल्याचे वास्तव आहे.रोजची उलाढाल लाखोंचीइंजिनिअरिंग कॉलनीतील सेक्स रॅकेटमध्ये १८ ते ४० वयोगटातील युवती व महिलांना आणण्यात येत होते. दरही प्रचंड असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली असून, रोज दीड ते दोन लाख रुपयांची उलाढाल या सेक्स रॅकेटवर होत असे. बड्या अधिकारी व व्यापाºयांची या ठिकाणी ये-जा असल्याची माहिती आहे.अधिकाºयांची नावे उघडया महिलेच्या घरात सुरू असलेल्या देहविक्रय अड्ड्यावर महसूल, पुरवठा, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका, शिक्षण विभाग, कृषी विद्यापीठ, पोलीस व एसीबीच्या अधिकाºयांसह शिक्षकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याचे समोर येत आहे. यासोबतच मोठे व्यापारीही या अड्ड्यावर लाखोंची उधळपट्टी करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.किचनमागे बनविली गोपनीय खोली!महिलेच्या घराच्या सुरुवातीला हॉल, नंतर एक बेडरूम त्यानंतर किचन व किचनमधील एका कपाटामागे असलेला छोटासा दरवाजा व त्यामागे असलेल्या खोल्यांमध्ये हा गोरखधंदा सुरू होता. कुणाचाही धोका निर्माण झाल्यास याच खोल्यांमधून घरामागे निघण्यासाठी एक रस्ताही तयार करण्यात आला होता. याच रस्त्यावरून दोन ग्राहक फरार होण्यात यशस्वी झाले.बेशुद्धावस्थेचे केले नाटक!छापा टाकताच देहविक्रय अड्डा चालिविणाºया महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळी तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांसह महसूल, महापालिका, शिक्षण विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने पोलिसांना धमक्या दिल्या; मात्र तिला किंचितही न जुमानल्यामुळे या महिलेने बेशुद्ध होण्याचे नाटक केले; मात्र पोलिसांनी तिला अटक करून ठाण्यात आणले, तसेच महिला पोलिसांच्या धाकदपटीने तिने या सेक्स रॅकेटचे भले माठे कथानकच पोलिसांसमोर उघड केले.गुरुजी तुम्हीहीविद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे व आदर्श म्हणून ज्यांच्याकडे समाज बघतो, त्या गुरुजींची मोठी ग्राहकी या अड्ड्यावर होती. पोलीस तपासात माहिती समोर आली. पती-पत्नी दोघेही शिक्षक असणाºया गुरुजींना वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आणि पीकेव्हीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी आवडायच्या, तर बँकेचे अधिकारीही या ठिकाणी आंबट शौक पूर्ण करण्यासाठी येत असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारी