जुगार खेळणारे ७ आरोपी मुद्देमालासह गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:39 IST2018-09-25T15:39:06+5:302018-09-25T15:39:41+5:30
अकोला : बावन्न ताश पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या ७ आरोपींना सीटी कोतवाली पोलिसांनी मुद्देमालासह गजाआड केले.

जुगार खेळणारे ७ आरोपी मुद्देमालासह गजाआड
अकोला : बावन्न ताश पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या ७ आरोपींना सीटी कोतवाली पोलिसांनी मुद्देमालासह गजाआड केले. ही घटना लक्ष्मी नगरात घडली.
सिटी कोतवाली पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना, गुप्त माहिती मिळाली की काही इसम लक्ष्मी नगरातील सागर घनबहादूर यांच्या पानपट्टीलगत ५२ ताश पत्त्यांवर जुगार खेळत आहे. तीन पत्ती रमी खेळावर रक्कमा लावल्या जात असल्याचा माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना खात्री झाल्यावर त्यांनी घटनास्थळावर छापा टाकला. घटनास्थळावरून ७ ईसमांना रंगेहात पकडण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये दीपक श्रावण कुशवाह, जितेश सुभाष चिटले ,अंकेश बद्रीप्रसाद शाहू, गोविंद पंडितराव शिंदे, अनिल गोकुळ मूर्तीकर, ऋषीकेश संजय रत्नपारखी , करण रवींद्र लांडगे यांचा समावेश आहे. आरोपींकडून ५१७० रु. नगदी, ७ सेल्यूलर मोबाईल किंमत २९२०० रू,२ मोटर सायकल किंमत १ लाख २५ हजार असा एकूण १ लाख ५९ हजार ६२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.