अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ
By Admin | Updated: June 3, 2014 21:40 IST2014-06-03T21:19:03+5:302014-06-03T21:40:28+5:30
अकोल्याच्या उमरी परिसरात अर्धवट स्थितीत जळालेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ
अकोला : उमरी परिसरातील स्मशानभूमीच्या बाजूला एका जागेत अर्धवट स्थितीत जळालेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. मृतदेहाचे दोन तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी बेवारस स्थितीत आढळून आल्याने परिसरात मृतदेहाचे तुकडे पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिव्हिल लाईन पोलिसांचा तपास सुरू होता.
उमरी परिसरातील रेल्वेमार्गालगत स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीजवळ अर्धवट जळालेल्या स्थितीत एक मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते आणि हे तुकडे वेगळ्या ठिकाणी दिसून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांना परिसरात अर्धवट स्थितीत जळालेला एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मृतदेहाची पाहणी केली. मृतदेहाचे दोन तुकडे आढळून आल्याने नागरिक अनेक तर्कविर्तक लावीत आहेत. या प्रकरणाचा तपास सिव्हिल लाईन पोलिस करीत आहेत.