ज्येष्ठांनी घ्यावा चौकस, ताजा व हलका आहार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST2021-03-26T04:19:09+5:302021-03-26T04:19:09+5:30
आहारतज्ज्ञ सांगतात.. दिवसाची सुरुवात गरम पाणी प्राशनाने करा. पचायला हलके पदार्थ आहारात घ्या. तळलेले, तिखट, आंबट, गोड, थंड पदार्थ ...

ज्येष्ठांनी घ्यावा चौकस, ताजा व हलका आहार!
आहारतज्ज्ञ सांगतात..
दिवसाची सुरुवात गरम पाणी प्राशनाने करा.
पचायला हलके पदार्थ आहारात घ्या.
तळलेले, तिखट, आंबट, गोड, थंड पदार्थ टाळा.
हंगामी पालेभाज्या फळभाज्या, फळं आहारात घ्या.
नियमित व्यायाम करा
सतत अंथरुणात झोपून न राहता दहा-पंधरा मिनिटे किंवा अर्धा तास शक्य होईल तो व्यायाम करावा. फिरणे, योगासने करण्यावर भर द्यावा. शरीराला शक्य होईल तेच व्यायाम करावे. ज्यांना डाॅक्टरांनी विशिष्ट व्यायामाचा सल्ला नाकारला असेल त्यांनी आराम करावा, असेही तज्ज्ञ सांगतात.
स्वच्छतेची घ्या काळजी
जेवणाआधी, जेवणानंतर, स्वच्छतागृहातून आल्यानंतर किमान २० सेकंद साबणाने स्वच्छ हात धुवा. वारंवार हाताळल्या जाणाऱ्या वस्तू जसे की चष्मा, मोबाईल सतत स्वच्छ करा. शिंकताना, खोकताना रुमाल वापरा.
ताजे जेवण घ्या
ज्येष्ठ नागरिकांनी दिवसातून चार वेळा ताजे जेवण घेतले पाहिजे. आजारात हंगामी भाज्या आणि फळांचा समावेश असावा. रात्री झोपण्यापूर्वी कपभर हळदीचे दूध घ्यावे. इतर व्याधींनी ग्रस्त असणाऱ्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने आहार घ्यावा.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय,अकोला