लस घेण्यासाठी ज्येष्ठांची ससेहोलपट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:19 AM2021-05-12T04:19:22+5:302021-05-12T04:19:22+5:30

--बॉक्स-- ज्येष्ठांना हेलपाटे व मनस्ताप कोव्हॅक्सिनसाठी सकाळी नऊ वाजता लेडी हॉर्डिंगमध्ये बोलावले. याठिकाणी केवळ १५० लसी उपलब्ध होत्या. त्यासाठी ...

Senior rabbits to get vaccinated! | लस घेण्यासाठी ज्येष्ठांची ससेहोलपट!

लस घेण्यासाठी ज्येष्ठांची ससेहोलपट!

googlenewsNext

--बॉक्स--

ज्येष्ठांना हेलपाटे व मनस्ताप

कोव्हॅक्सिनसाठी सकाळी नऊ वाजता लेडी हॉर्डिंगमध्ये बोलावले. याठिकाणी केवळ १५० लसी उपलब्ध होत्या. त्यासाठी ६०० पेक्षा अधिक लोकांनी गर्दी केली. गर्दी व गोंधळ पाहून हे सेंटर बंद करण्यात आले. नागरिकांना अकोटफैल येथे पाठविण्यात आले. जिल्हा प्रशासनाचे कोणतेही नियोजन नसल्याने नागरिकांना हेलपाटे व मनस्ताप सहन करावा लागला.

--बॉक्स--

पाण्याची सुविधा नाही!

शहरातील ४० अंश सेल्सिअस तापमानात उभे असलेल्या ज्येष्ठांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. तहान लागल्यास पाणी नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागला.

--बॉक्स--

सावलीसाठी मंडपही वेळेवर

अशोक नगर येथील आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये पाठविण्यात आल्यानंतर कसेबसे ज्येष्ठ नागरिक येथे पोहोचले; मात्र या केंद्रावरही नियोजनाचा अभाव दिसून आला. ज्येष्ठांना उन्हात रांगेत उभे राहावे लागले. अनेकांनी झाडा, झुडपांचा आधार घ्यावा लागला. वाढती संख्या पाहता वेळेवर मंडप टाकण्यात आला.

--बॉक्स--

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

लेडी हार्डिंग व अशोक नगर या दोन्ही केंद्रांवर लसीकरणासाठी ज्येष्ठांची गर्दी झाली होती. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहावयास मिळाले.

--कोट--

दुपारी १ ते ५ लसीकरणाचा वेळ ठरविण्यात आला आहे; परंतु सकाळपासून ज्येष्ठांनी लसीकरणासाठी गर्दी केली. यामध्ये फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. यावेळी रुग्णालयाच्या ओपीडीची वेळ आहे. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचाही प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे नाइलाजास्तव वेळेवर हा निर्णय घेण्यात आला.

- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक

Web Title: Senior rabbits to get vaccinated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.