शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची झुंबड

By atul.jaiswal | Published: June 23, 2022 10:53 AM

Senior citizens rush to get smart cards : ज्येष्ठ नागरिकांसह इतर सवलतपात्र नागरिक स्मार्ट कार्ड काढण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र गत चार ते पाच दिवसांपासून दिसत आहे.

ठळक मुद्देमध्यवर्ती बसस्थानकावरील कक्षासमोर गर्दी दिवसभर उभे राहूनही नोंदणी होईना

- अतुल जयस्वाल

अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व इतर सवलतपात्र प्रवाशांना १ जुलैपासून स्मार्ट कार्ड बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत प्रचलित असलेली ओळखपत्रे यापुढे ग्राह्य धरली जाणार नसल्याने ज्येष्ठ नागरिकांसह इतर सवलतपात्र नागरिक स्मार्ट कार्ड काढण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र गत चार ते पाच दिवसांपासून दिसत आहे.

गत दोन वर्षांपासून सुरू असलेली कोरोना संसर्गाची स्थिती व एसटी कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यापासून पुकारलेला संप या दोन कारणांमुळे आगार व विभागीय कार्यालयांमध्ये स्मार्ट कार्ड नोंदणी प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे आतापर्यंत वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. हजारो सवलतधारकांनी नव्या स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केलेली नाही. तसेच नोंदणी केलेल्या अनेकांना स्मार्ट कार्ड वितरित झालेले नाहीत. परिणामी सवलतधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाने ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही शेवटची मुदतवाढ असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व इतर सवलतपात्र नागरिक मध्यवर्ती बसस्थानकावरील नोंदणी कक्षासमोर गर्दी करत आहेत. याठिकाणी नोंदणीसाठी एकच संगणक व कर्मचारी असल्याने नागरिकांना तासंतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.

आगार क्र. एकचा भारही आगार क्र. २ वर

स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे. यासाठी आगार क्र. एक व आगार क्र. २ येथे नोंदणी कक्ष आहेत. पातूर, बार्शीटाळी व अकोला शहरातील उत्तरेकडच्या भागातील नागरिकांसाठी आगार क्र. एक येथे कक्ष दिलेला आहे. तथापी, या आगारातील कक्ष बंदच असल्याने हा सर्व भार आगार क्र. २ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकावरील कक्षावर येत आहे. याठिकाणी आधीच बाळापूर व अकोला तालुका तसेच अकोला शहरातील नागरिकांचा भार आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकावरील कक्षासमोर मोठी गर्दी होत आहे.

 

कनेक्टिव्हिटीचा खोडा

स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाते. यासाठी मध्यवर्ती स्थानकावरील कक्षात संगणक व इंटरनेट जोडणी आहे. याठिकाणी दोन पाळ्यांमध्ये नोंदणीचे काम सुरू करण्यात आले आहे. दिवसभर स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. अशातच अनेकदा इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या समोर येते. मंगळवारी दिवसभर इंटरनेट नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना आल्यापावली परतावे लागले.

उरले केवळ आठ दिवस

स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३० जून ही शेवटची तारीख आहे. आधीच अनेकदा मुदतवाढ मिळाल्याने यावेळी मुदतवाढ मिळणार नसल्याचे महामंडळाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आता अवघे आठ दिवस उरले आहेत. रात्र थोडी अन् सोंगे फार अशी परिस्थिती असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक व इतर सवलतपात्र नागरिक नोंदणीविनाच राहण्याची शक्यता आहे.

काय म्हणतात ज्येष्ठ नागरिक?

दोन दिवस झाले स्मार्ट कार्ड काढण्यासाठी बसस्थानकावर येत आहे. मंगळवारी इंटरनेट नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तसेच परत जावे लागले. बुधवारी सकाळी लवकर आल्यानंतरही रांगेत साठावा क्रमांक आहे. रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. सरकारने आणखी मुदतवाढ द्यायला हवी.

- नामदेव ढगे, ज्येष्ठ नागरिक, अकोला

सकाळी नऊ वाजताच रांगेत लागल्यावर १२ वाजता माझा क्रमांक आला. खिडकीवर आल्यानंतर आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे तीन तास रांगेत उभे राहण्याची मेहनत वाया गेली.

- निर्मला भारसाकळे, ज्येष्ठ नागरिक, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाAkola Bus Standअकोला बस स्थानकstate transportएसटी