गर्भपाताच्या गोळ्या विक्री; महिलेस कोठडी

By Admin | Updated: April 7, 2017 01:01 IST2017-04-07T01:01:15+5:302017-04-07T01:01:15+5:30

अकोला- गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची अवैध विक्री करणाऱ्या महिलेस न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Selling abortion pills; Lady's closet | गर्भपाताच्या गोळ्या विक्री; महिलेस कोठडी

गर्भपाताच्या गोळ्या विक्री; महिलेस कोठडी

अकोला : गर्भपात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची अवैध विक्री करणाऱ्या महिलेला गुरुवारी दुपारी खदान पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने महिलेस रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीपीएनडीटी पथकाने बुधवारी दुपारी खदान परिसरातील रहिमोन्निसा बेगम मो. याकुब या महिलेच्या घरी छापा घालून मिजोप्रॉसच्या चार गोळ्या आणि गर्भपात करण्यासाठी उपयोगात येणारी साधनसामग्रीही जप्त करण्यात आली.
खदान पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली. गुरुवारी दुपारी तिला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Selling abortion pills; Lady's closet