ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उभारले सेल्फि पॉईंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 19:09 IST2021-07-12T19:09:07+5:302021-07-12T19:09:58+5:30

Selfie point set up to wish Olympic athletes : शास्त्री स्टेडियम, रेल्वेस्टेशन व जिल्हाधिकारी कार्यालय अशा तिन ठिकाणी सेल्फि पॉईंट उभारण्यात आले आहेत.

Selfie point set up to wish Olympic athletes in Akola City | ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उभारले सेल्फि पॉईंट

ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी उभारले सेल्फि पॉईंट

अकोला : टोकियो येथे २३ जुलैपासून सुरु होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतातून खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यात मह्राराष्ट्रातील दहा खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी क्रीडा विभागाने अकोला शहरात तीन ठिकाणी सेल्फि पॉईंट उभारले आहेत.

या सेल्फि पॉईंटवर सोमवारी स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सेल्फी घेऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी कर्यालयाच्या वतीने अकोला शहरात शास्त्री स्टेडियम, रेल्वेस्टेशन व जिल्हाधिकारी कार्यालय अशा तिन ठिकाणी सेल्फि पॉईंट उभारण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ लावण्यात आलेल्या सेल्फि पॉईंटला जिल्हाधिकारी पापळकर यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी- कर्मचारी यांनी सेल्फि घेऊन शुभेच्छा दिल्या. कोणीही नागरीक, क्रीडा प्रेमी येथे येऊन सेल्फि घेऊन आपल्या शुभेच्छा देऊ शकतात,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.

Web Title: Selfie point set up to wish Olympic athletes in Akola City