खासदार आदर्श ग्रामसाठी चार गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:03 AM2020-08-26T11:03:17+5:302020-08-26T11:03:55+5:30

या गावासाठी प्रभारी अधिकारी म्हणून त्या त्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची निवड करण्यात आलेली आहे.

Selection of four villages for Sansad Adarsh Gram | खासदार आदर्श ग्रामसाठी चार गावांची निवड

खासदार आदर्श ग्रामसाठी चार गावांची निवड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सासंद आदर्श ग्राम योजनेमध्ये अकोला लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी जिल्ह्यातील चार गावांची निवड केली आहे. यामध्ये सन २०१९-२० साठी पातूर तालुक्यातील माळराजूरा, सन २०-२१ साठी अकोट तालुक्यातील उमरा, सन २१-२२ साठी बार्शीटाकळी तालुक्यातील सिंदखेड, सन २२-२३ साठी बाळापूर तालुक्यातील निंबा गावाचा समावेश आहे. या गावांसाठी विकास आराखडा तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व विभागाच्या योजनाचे एकत्रीकरण करुन १५ सप्टेंबरपर्यंत ग्राम विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित सांसद आदर्श ग्राम योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, उप-जिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मरसाळे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, दीपक बाजड, शिधणाधिकारी प्रकाश मुकूंद, सहा. वनसंरक्षक सुरेश बदोले, गटविकास अधिकारी गोपाल बोंडे, विनोद शिंदे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सुनील मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. निवड केलेल्या गावात जनजागृती व्हावी, यासाठी गावाच्या सीमेवर सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये निवड झाली असल्याचा फलक दर्शनी भागात लावावे, तसेच गावातील ग्रामस्थाच्या संमतीने व तज्ज्ञ लोकांच्या मदतीने ग्रामविकास आराखडा तयार करावा.

२0१९-२० मध्ये निवड झालेल्या माळराजुरा या गावाचा ग्रामविकास आराखडा ५ सप्टेंबर पूर्वी तयार करावा. या गावासाठी प्रभारी अधिकारी म्हणून त्या त्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांची निवड करण्यात आलेली आहे. आदर्श गावात शिक्षण, आरोग्य तसेच इतर मूलभूत सोईसुविधा उपलब्ध होईल, असा सर्वांगीण विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

 

Web Title: Selection of four villages for Sansad Adarsh Gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला