खुनासाठी वापरलेला लाकडी दांडा जप्त
By Admin | Updated: January 26, 2017 10:23 IST2017-01-26T10:23:12+5:302017-01-26T10:23:12+5:30
चितलवाडी फाट्यानजीक २0 जानेवारीच्या उशिरा रात्री झाला होता खून.

खुनासाठी वापरलेला लाकडी दांडा जप्त
हिवरखेड(अकोला), दि. २५- चितलवाडी फाट्यानजीक २0 जानेवारीच्या उशिरा रात्री बेलखेड येथील शे. इमरान शे. रहेमान (२२) याची हत्या करण्यासाठी वापरलेला लाकडी दांडा आरोपी प्रमोद वानरेने चौकशीत दाखवून दिल्याने हिवरखेड पोलिसांनी २५ जानेवारी रोजी जप्त केला. आरोपी प्रमोद रामदास वानरे याला हिवरखेड पोलिसांनी २५ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सदर आरोपीने पोलीस कोठडीत गुन्ह्याची कबुली दिली. त्याने इमरानच्या हत्येसाठी वापरलेला लाकडाचा दांडा चितलवाडी फाट्यावर असलेल्या गुराच्या पिण्याच्या पाण्याचा हौदामागे (धर्माळ) फेकला होता. तो दांडा पोलिसांनी तो पंचासमक्ष जप्त केला.