शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे विकणार्‍या कंपन्यांना जिल्हाबंदी करा!

By admin | Updated: August 5, 2014 01:09 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची शासनाकडे शिफारस

अकोला- खरीप हंगामामध्ये पेरलेले बियाणे उगवले नसल्याचे जिल्ह्यातील १५0 च्यावर शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले. शेतकर्‍यांना अशाप्रकारे अडचणीत आणणार्‍या कंपन्यांना जिल्हय़ात बियाणे विक्री करण्यास प्रतिबंध करावा, अशी शिफारस करणारा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सोमवारी घेण्यात आला. जिल्हा परिषद सभागृहात दुपारी २ वाजता आयोजित स्थायी समिती सभेत शिवसेनेचे सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी बोगस बियाण्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. उगवणशक्ती नसलेले बियाणे विक्री करणार्‍या कंपन्यांमुळे जिल्हय़ातील शेतकरी नागवला जात आहे. अशा कंपन्यांच्याविरोधात शेतकर्‍यांना ग्राहक मंचशिवाय दुसरा पर्याय नसतो. आधीच आर्थिक संकटात सापडलेला अल्पभूधारक शेतकरी बोगस बियाणे निघाल्यानंतर कंपन्यांच्याविरोधात कायदेशीर लढाईसुद्धा लढू शकत नाही. त्यामुळे अशा कंपन्यांना काळ्य़ा यादीत टाकून जिल्ह्यात बियाणे विक्री करण्यास बंदी करण्यात यावी, अशी शिफारस करणारा ठराव स्थायी समितीमध्ये घेण्यात आला. हा ठराव पांडे गुरुजी यांनी मांडल्यानंतर त्याला भारिप-बमसंचे गटनेते विजय लव्हाळे यांच्यासह सर्व सदस्यांनी एकमताने अनुमोदन दिले. यासभेला अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, कृषी सभापती रामदास मालवे, समाजकल्याण व महिला बालकल्याण सभापती आदींची उपस्थिती होती.