चांगले काम व गुणवत्ता हेच चित्रपटसृष्टीतील यशाचे रहस्य

By Admin | Updated: May 11, 2015 02:21 IST2015-05-11T02:21:21+5:302015-05-11T02:21:21+5:30

अकोल्याचा पहिला पडद्यामागील हीरो; ‘टाइमपास २’, ‘बाळकडू’ चित्रपटात केले ‘स्टिल- मेकिंग’.

The secret of the success of the film industry is good work and quality | चांगले काम व गुणवत्ता हेच चित्रपटसृष्टीतील यशाचे रहस्य

चांगले काम व गुणवत्ता हेच चित्रपटसृष्टीतील यशाचे रहस्य

विवेक चांदूरकर/ अकोला : गुणवत्ता, काम अचूक आणि अधिक श्रम करण्याची तयारी हेच चित्रपटसृष्टीतील यशाचे रहस्य असल्याचे मत अकोला येथील रहिवासी व मराठी चित्रपटसृष्टीत पडद्यामागे स्टिल मेकिंग या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडणार्‍या प्रथमेश पिंपळे याने व्यक्त केले.
वर्‍हाडातील प्रसिद्ध चित्रकार सतीश पिंपळे यांचे बंधू किशोर पिंपळे हे व्यवसायाने चित्रकार आहेत. त्यांचा मुलगा प्रथमेश याने बाळकडू, टाइमपास २ अशा सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांमध्ये स्टिल मेकिंगचे काम केले आहे. पुणे येथील फग्यरुसन महाविद्यालयातून छायाचित्रणाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने तेथेच छायाचित्रकार प्रथमेश रंगोळे यांच्यासोबत चित्रपटांचे पोस्टर बनविणे, गाण्यांची शूटिंग करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर त्याने थेट चित्रपटसृष्टीत झेप घेतली. त्याच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न : चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी कशी मिळाली?
प्रथम : मी पुणे येथील फग्यरुसन महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथमेश रंगोळे यांच्यासोबत चित्रपटांचे पोस्टर बनविणे, गाणे शूट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या माध्यमातूनच ह्यबाळकडूह्ण या चित्रपटात स्टिल मेकिंगचे काम मिळाले. त्यानंतर ह्यटाइपमास टूह्ण या चित्रपटाच्या टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली.

प्रश्न : अकोल्यातून थेट मुंबई गाठली व चित्रपटांमध्ये काम मिळाले. याबाबत काय सांगशील?
प्रथम : ह्यबाळकडूह्ण व ह्यटाइमपास २ह्णसारख्या मोठय़ा व सुपरहिट झालेल्या चित्रपटांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. मी ह्यटाइपमासह्ण हा चित्रपट अकोल्यातील सिनेमागृहात बघितला होता. त्यावेळी या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करण्याची संधी मिळेल, असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. ह्यटाइमपास २ह्णच्या सेटवर काम करणे स्वप्नवत वाटत होते.

प्रश्न : केवळ पडद्यामागचे काम करण्याऐवजी स्क्रीनवर दिसावे असे वाटत नाही का?
प्रथम : मला अभिनय क्षेत्राकडे वळायचे नाही. माझे ध्येय छायादिग्दर्शक व्हायचे आहे; मात्र ह्यबाळकडूह्ण आणि ह्यटाइमपास २ह्णमध्ये माझी थोडी भूमिका आहे.

प्रश्न : चित्रपटांमध्ये काम करताना अनुभव कसे आले?
प्रथम : अनुभव चांगलेच आलेत. अनेकांशी ओळख झाली. मोठे कलावंत भेटले. त्यांना जवळून बघता आले तसेच अनुभवता आले. बरंच काही शिकायला मिळालं.

प्रश्न : अकोल्यातील तरुणांना चित्रपटसृष्टीत संधी मिळावी, याकरिता काही प्रयत्न करणार आहे का?
प्रथम : हो, नक्कीच करणार आहे. सध्या मीच शिकत आहे, अनुभव घेत आहे. भविष्यात अकोल्यातील होतकरू तरुणांसाठी निश्‍चितच प्रयत्न करणार आहे.

प्रश्न : आगामी चित्रपट कोणते?
प्रथम : ह्यसंदूकह्ण हा मराठी चित्रपट येतोय. यामध्ये मी काम करणार आहे. दिग्दर्शक रवि जाधव यांचा ह्यबॅन्जोह्ण हा हिंदी चित्रपट येत आहे. या चित्रपटाचेही स्टिल मेकिंगचे काम आमच्याकडेच आले.

प्रश्न : चित्रपटसृष्टीत यश मिळविण्यामागील रहस्य काय?
प्रथम : काम करण्याची जिद्द आणि श्रमाच्या आधारावर चित्रपटसृष्टीत यश मिळू शकते. मला त्याचा अनुभव आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत चांगले काम करणार्‍याला, श्रम करण्याची तयारी असणार्‍याला अधिक महत्त्व दिले जाते.
 

Web Title: The secret of the success of the film industry is good work and quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.