शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातप्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या बाळाची बालसुधारगृहात रवानगी
2
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
3
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
4
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
5
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
6
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
7
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
8
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
9
अनुप्रिया पटेल, रामदास आठवलेंच्या राज भैयांवरील वक्तव्यांनी यूपीमध्ये भाजपाचं गणित बिघडवलं, होणार मोठं नुकसान? 
10
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
11
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
12
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
13
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
14
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
15
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
16
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
17
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
18
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
19
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
20
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण

ऐन हंगामात सोयाबीनची आवक मंदावली

By admin | Published: November 09, 2014 12:24 AM

कमी उत्पादनाचा परिणाम, अकोला जिल्ह्यातील बाजार समित्या ओस.

अकोला: अल्प पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, उत्पादनातही घट आली आहे. त्यामुळे बाजार समितीत येणार्‍या सोयाबीनची आवक ऐन हंगामातच मंदावली आहे. गत आठ दिवसांपासून ७ ते ८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत असून, अकोला बाजार समितीत ८६ हजार क्विंटलची खरेदी झाली आहे. यावर्षी खरीप हंगामात पाऊस दोन महिने उशिरा झाला. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्याने मूग आणि उडीद ही पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. त्यामुळे शेतकर्‍यांना सोयाबीन पिकापासून आशा होती. पाऊस उशिरा झाल्यामुळे यावर्षी उत्पादन कमी होईल, असा अंदाज शेती तज्ज्ञ जुलै महिन्यातच व्यक्त करीत होते. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातही मुबलक पाऊस झाला नसल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. परिणामी अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनची काढणीच केली नाही. त्यामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरुवातीपासूनच आवक कमी होती. दिवाळीच्या पूर्वी सोयाबीनची तीन ते चार क्विंटल आवक होती. तर दिवाळीनंतर आवक थोड्या प्रमाणात वाढली. नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वत्रच सोयाबीनची काढणी होते. त्यामुळे यावेळी दररोज १५ ते २0 हजार क्विंटल आवक असते. मात्र, सध्या केवळ सात ते आठ हजार क्विंटलची आवक होत आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन अध्र्यापेक्षाही कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या शेतात शेतकरी सोयाबीन पिकाची काढणी करीत आहेत. मात्र, काही शेतकर्‍यांनी उत्पन्न अत्यल्प झाल्यामुळे सोयाबीन न काढताच शेतात नांगरणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश भागातील सोयाबनीची काढणी झाली असून, विक्रीही झाली आहे.