शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

महापौर पदासाठी अर्चना मसने यांच्या नावावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 10:47 IST

अर्चना मसने यांनी महापौर पदासाठी तसेच प्रभाग क्र.६ मधील भाजप नगरसेवक राजेंद्र गिरी यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापौर पदाच्या पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका अर्चना जयंत मसने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सोमवारी महापालिकेत अर्चना मसने यांनी महापौर पदासाठी तसेच प्रभाग क्र.६ मधील भाजप नगरसेवक राजेंद्र गिरी यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. काँग्रेसतर्फे महापौर पदासाठी प्रभाग क्र.१ मधील अजरा नसरीन मकसूद खान यांनी तर उपमहापौर पदासाठी प्रभाग २ मधील काँग्रेस नगरसेवक पराग कांबळे यांनी अर्ज सादर केला.महापालिकेत विजय अग्रवाल यांच्या महापौर पदाचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे पुढील अडीच वर्षांच्या महापौर पदासाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाले. अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातील नगरसेविकेची निवड करण्यासाठी भाजपच्यावतीने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता पक्ष कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. महापौरपदासाठी अर्चना मसने तसेच उपमहापौर पदासाठी राजेंद्र गिरी यांची निवड करण्यात आली. संबंधित दोन्ही उमेदवारांनी दुपारी मनपाचे प्रभारी नगरसचिव श्याम ठाकूर यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर केले. याव्यतिरिक्त नगरसेविका अनुराधा नावकार, दीप मनवानी यांनीही नामनिर्देशन पत्र दिले. यावेळी महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती विनोद मापारी, महानगराध्यक्ष किशोर पाटील यांच्यासह भाजप नगरसेवक उपस्थित होते. काँग्रेस उमेदवारांनी अर्ज सादर करतेवेळी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण, नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांच्यासह काँग्रेस नगरसेवक उपस्थित होते.

शुक्रवारी विशेष सभामहापौर, उपमहापौर पदाच्या निवडीसाठी येत्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर कामकाज पाहतील.

काँग्रेसच्या खेळीकडे लक्षमहापालिकेत एकूण ८० नगरसेवकांपैकी भाजपचे ४८ नगरसेवक आहेत. विरोधी पक्ष काँग्रेसचे १३ नगरसेवक असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, भारिप-बमसंचे ३, एमआयएम-१ आणि दोन अपक्ष नगरसेवक आहेत. शिवसेनेचे ८ नगरसेवक आहेत. राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडी लक्षात घेता महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आल्यास त्यांचे संख्याबळ ३२ होणार आहे. अर्थात, भाजपचा महापौर होणार हे स्पष्ट असले तरी तो अविरोध होणार नाही, याकरिता काँग्रेसच्या खेळीकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका