शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

जलयुक्त योजनेच्या खर्चाला कात्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 2:31 AM

जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करीत सुरुवात करतानाच ती कामे  यंत्राद्वारे करण्यासाठी शासन निधीचीही प्रचंड उधळपट्टी करण्यात आली. हा प्रकार  अकोला जिल्हय़ातील निविदा प्रक्रियेसह राज्यात इतरत्रही उघड झाला. त्यामुळे आ ता जलयुक्तच्या कामांसाठी इंधन खर्च शासनाकडून दिला जाईल. इतर खर्च  खासगी संस्था आणि शेतकर्‍यांनी करावा, असा फंडा शासनाने सुरू केला आहे.

ठळक मुद्देशासन केवळ इंधन खर्च देणार लोकसहभाग, ‘सीएसआर’ निधीची अट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करीत सुरुवात करतानाच ती कामे  यंत्राद्वारे करण्यासाठी शासन निधीचीही प्रचंड उधळपट्टी करण्यात आली. हा प्रकार  अकोला जिल्हय़ातील निविदा प्रक्रियेसह राज्यात इतरत्रही उघड झाला. त्यामुळे आ ता जलयुक्तच्या कामांसाठी इंधन खर्च शासनाकडून दिला जाईल. इतर खर्च  खासगी संस्था आणि शेतकर्‍यांनी करावा, असा फंडा शासनाने सुरू केला आहे.जलयुक्त शिवार योजनेतून डीप सीसीटी करणे, एरिया ट्रीटमेंट करणे, नाला  खोलीकरण, रुंदीकरण, गाव तलावातील गाळ काढणे, शेततळे, खोदतळे करणे या  कामांसाठी विविध शासकीय यंत्रणांना जेसीबी, पोक्लॅन मशीनची गरज असल्याचे  जिल्हास्तरीय समित्यांनी ठरविले. यंत्राद्वारे करावयाच्या खोदकाम, माती कामासाठी  बाजारभावापेक्षा तब्बल दोनशे टक्के अधिक दराने कामे देण्यात आली. विशेष  म्हणजे, निविदेतील दराला मंजुरी देताना त्यासाठी जलसंपदा विभागाचे अमरावती  येथील द्वार निर्मिती व उभारणी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सीडब्ल्यूसी  मानकानुसार जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे मंजुरीसाठी दर प्रस् तावित केले होते. त्याबाबतची माहिती मागविण्यात आली; मात्र ते दर बाजूला ठेवत  त्याच्या दोनशे टक्के अधिक दराला मंजुरी देण्यात आली. हा प्रकार अकोला  जिल्हय़ात मे २0१६ मध्ये उघड झाला. ‘लोकमत’ने ती वस्तुस्थितीही मांडली होती.  त्यावेळी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी विभागीय आयुक्तांकडून चौकशी  करण्याचे सांगितले होते. त्याचवेळी राज्यातील इतरही जिल्हय़ांमध्ये अनेक प्रकरणे  उघड झाली. त्याची दखल घेत शासनाने जलयुक्त शिवार योजनेसाठी निधी खर्च  करण्यालाच कात्री लावली आहे. 

शासन करणार ५५ टक्के खर्च!जलयुक्त शिवार अभियानातील कामांसाठी शासन यापुढे ५५ टक्के खर्चाची र क्कम देणार आहे. उर्वरित ४५ टक्के रक्कम खासगी संस्था आणि लोकसहभागातून  उभी करावी लागणार आहे. या पद्धतीने कामे करण्यासाठी अकोला, चंद्रपूर,  अमरावती, यवतमाळ या जिल्हय़ांमध्ये टाटा ट्रस्ट, अंबुजा सिमेंट यांच्या प्रकल्पांना  शासनाने २ नोव्हेंबर रोजी मान्यता दिली आहे. 

शासनानेच ठरवून दिले यंत्राचे दरगेल्यावर्षी जिल्हास्तरीय समित्यांनी निविदेद्वारे यंत्रांसाठी ठरविलेले दर बाजारभावा पेक्षा कित्येक पटींनी अधिक होते. आता हा प्रकार बंद करण्यासाठी शासनानेच दर  निश्‍चित केले आहेत. ते अत्यंत कमी असल्याने कामांसाठी यंत्र मिळण्याची शक्य ताही धूसर झाली आहे. नाला खोलीकरण, रुंदीकरणाच्या कामासाठी खासगी संस् था, व्यक्ती, ग्रामपंचायतींनी यंत्र दिल्यास इंधन आणि यंत्राचे भाडे शासन देणार  आहे. त्यासाठी ठरलेल्या दरानेच रक्कम अदा केली जाणार आहे. 

लोकसहभागातून होणारी कामेजलयुक्त शिवार योजनेतील लोकसहभागातून होणार्‍या कामांमध्ये पाणलोट क्षेत्र  विकासाची कामे, कंपार्टमेंट बंडिंग, ढाळीचे बांध, सलग समतल चर, खोल सलग  समतल चर, मजगी, अनघड दगडी बांध, शेततळे, माती नाला बांध, अर्दन स्ट्र क्चर, गॅबियन बंधारा, सिमेंट बंधारा, गाळ काढणे. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार