शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘काम बंद’ आंदोलनाची व्याप्ती वाढली; अकोला जिल्ह्यात ‘एनएचएम’ ठप्प

By atul.jaiswal | Updated: May 14, 2018 16:04 IST

आंदोलनात आता आशा स्वयंसेविका, एएनएम यांच्यासह जिल्हाभरातील तांत्रिक व गैर तांत्रिक कंत्राटी कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान ठप्प झाले.

ठळक मुद्दे८ मेपासून पुन्हा सुरु केलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाची व्याप्ती सोमवार, १४ मे रोजी वाढली. संपकरी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अशोक वाटिका येथे धरणे आंदोलन सुरु केले आहे. सोमवारी अशोक वाटीका येथील आंदोलनस्थळी ७०० ते ८०० जण उपस्थित होते.

अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत (एनएचएम)आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत विनाशर्त समायोजन आणि समान काम-समान वेतन या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी ८ मेपासून पुन्हा सुरु केलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाची व्याप्ती सोमवार, १४ मे रोजी वाढली. येथील अशोक वाटीका परिसरात सुरु असलेल्या या आंदोलनात आता आरोग्य यंत्रणेचा ग्रामीण भागातील पाया समजल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका, एएनएम यांच्यासह जिल्हाभरातील तांत्रिक व गैर तांत्रिक कंत्राटी कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान ठप्प झाले. मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष मनोज कडू व जिल्हा सचिव गोपाल अंभोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्यभरातील ‘एनएचएम’ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी २१ एप्रिल रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक होऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अभ्यास आणि शिफारस करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. समिती गठित करण्याबाबतचा शासन निर्णय तीन दिवसांत काढणे अपेक्षित असताना शासनाकडून दिरंगाई होत असल्याचे पाहून संघटनेने ८ मे रोजी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले. याची दखल घेत शासनाने त्याच दिवशी समिती गठित करण्याचा शासन निर्णय काढला. या समितीची कार्यकक्षा व इतर बाबींमुळे कर्मचाºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही समिती म्हणजे केवळ फार्स असल्याचे सांगत संघटनेने आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली.आशा, गटप्रवर्तकांचा सहभागसंपकरी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अशोक वाटिका येथे धरणे आंदोलन सुरु केले आहे. सोमवार, १४ मे रोजी या आंदोलनात आशा स्वयंसेविका, एएनएम, आशा समन्वय, गटप्रवर्तक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले. त्यामुळे हे आंदोलन व्यापक झाले आहे. या आंदोलनात एनएचएम अंतर्गत कार्यरत असलेले स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, डाटा एन्ट्री आॅपरेटर यांच्यासह सर्वच कर्मचारी सहभागी झाल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान ठप्प झाले आहे. सोमवारी अशोक वाटीका येथील आंदोलनस्थळी ७०० ते ८०० जण उपस्थित होते, असे जिल्हा सचिव गोपाल अंभोरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाEmployeeकर्मचारीagitationआंदोलन