संपकरी ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांना शासनाचा ४८ तासांचा अल्टिमेटम

By atul.jaiswal | Published: May 11, 2018 04:51 PM2018-05-11T16:51:18+5:302018-05-11T16:55:09+5:30

काम बंद आंदोलन पुकारणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण अभियान (एनएचएम)अंतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने कामावर रुजू होण्यासाठी ४८ तासांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे.

Government 48 hours ultimatum to ' NHM employees | संपकरी ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांना शासनाचा ४८ तासांचा अल्टिमेटम

संपकरी ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांना शासनाचा ४८ तासांचा अल्टिमेटम

Next
ठळक मुद्दे ४८ तासांत कामावर रुजू होण्यास सांगावे, न झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी, अशा सूचना. अशोक वाटीका येथे धरणे आंदोलन करणाऱ्या ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांनी अभियान संचालकांच्या परिपत्रकाची होळी केली.कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना १० मे रोजी काढलेल्या परिपत्रकात दिलेल्या आहेत.

अकोला : शासकीय सेवेत विनाशर्त समायोजन आणि समान काम-समान वेतन या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी ८ मे पासून पुन्हा बेमुदत काम बंद आंदोलन पुकारणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण अभियान (एनएचएम)अंतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने कामावर रुजू होण्यासाठी ४८ तासांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. संपावर असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ४८ तासांत कामावर रुजू होण्यास सांगावे, न झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी, अशा सूचना आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या कार्यालयातून राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ)यांना एका पत्राद्वारे जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या इशाऱ्यानंतरही एनएचएम कर्मचारी भूमिकेवर ठाम असून, मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज कडू व जिल्हा सचिव गोपाल अंभोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राज्यभरातील ‘एनएचएम’ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १२ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी २१ एप्रिल रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक होऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अभ्यास आणि शिफारस करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. समिती गठीत करण्याबाबतचा शासन निर्णय तीन दिवसांत काढणे अपेक्षित असताना शासनाकडून दिरंगाई होत असल्याचे पाहून संघटनेने ८ मे रोजी पुन्हा कामबंद आंदोलन सुरु केले. याची दखल घेत शासनाने त्याच दिवशी समिती गठीत करण्याचा शासन निर्णय काढला. या समितीची कार्यकक्षा व इतर बाबींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही समिती म्हणने केवळ फार्स असल्याचे सांगत संघटनेने आंदोलन सुरुच ठेवण्याचा भूमिका घेतली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य विभागाचा कारभार विस्कळीत झाल्याचे पाहून शासनाने कठोर भूमिका घेतली. संपकरी कर्मचाºयांना ४८ तासाच्या आत कामावर रूजू करून घेण्यात यावे. कामावर रूजू न झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त क रून नवीन पदभरती तात्काळ सुरू करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना १० मे रोजी काढलेल्या परिपत्रकात दिलेल्या आहेत.

कर्मचाऱ्यांनी केली परिपत्रकाची होळी
शासनाने संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्याचे आदेश जारी केल्यानंतर संघटनेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा निर्धार करीत येथील अशोक वाटीका येथे धरणे आंदोलन करणाऱ्या ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांनी अभियान संचालकांच्या परिपत्रकाची होळी केली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज कडू, सचिव गोपाल अंभोरे, सचिन उन्होने, पराग रेलकुंतलवार, सचिन पाटेकर, अमोल घोडे, प्रकाश कोल्हे, रमन लोखंडे, पंकज डिक्कर, परेश फिरके, अनिल जाधव यांच्यासह जिल्हाभरातील कंत्राटी एनएचएम कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

Web Title: Government 48 hours ultimatum to ' NHM employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.