विज्ञान शिष्यवृत्ती परीक्षा; रुद्राक्षी राज्यातून पहिली
By Admin | Updated: June 16, 2017 02:16 IST2017-06-16T02:16:28+5:302017-06-16T02:16:28+5:30
अकोल्यातील सर्वाधिक विद्यार्थी: प्रणीत देशमुख द्वितीय

विज्ञान शिष्यवृत्ती परीक्षा; रुद्राक्षी राज्यातून पहिली
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अत्यंत प्रतिष्ठेच्या विझ्डम विज्ञान शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अकोला जिल्ह्यातील २० विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या परीक्षेत कोठारी कॉन्व्हेंटमधील इयत्ता तिसरीत शिकणारी विद्यार्थिनी रुद्राक्षी उकंडे हिने १०० पैकी ९९ गुण प्राप्त करीत राज्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला. माउंट कारमेल शाळेचा विद्यार्थी प्रणीत प्रवीण देशमुख याने ९८ गुण प्राप्त करीत राज्यातून द्वितीय स्थान पटकावले. विझ्डम विज्ञान शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यातून सर्वाधिक २० विद्यार्थी अकोला जिल्ह्यातील आहेत, हे विशेष.
विझ्डम विज्ञान शिष्यवृत्ती परीक्षा शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची मानली जाते. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेला राज्यभरातून ९ लाख २० हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
या सर्व विद्यार्थ्यांमधून रुद्राक्षी पंकज उकंडे हिने घवघवीत यश प्राप्त केले. रुद्राक्षी ही सहायक पोलीस निरीक्षक पंकज उकंडे यांची कन्या आहे. यासोबतच अकोट येथील वंश शिवकुमार अग्रवाल, सुयश सचिन लोखंडे, अनुराग राजेश दाते, भौमिक प्रशांत अग्रवाल यांनी ९५ गुण प्राप्त केले. अकोल्यातील ध्रुव पंकज अग्रवाल (९५ गुण) आदिती विजय कोल्हे (९५), देवर्ष मनीष बाछुका (९४), केनिशा भालचंद्र सुर्वे (९३), सार्थक अजित कुळकर्णी (९२), श्लोक परीक्षित सारडा (९१), अभ्युदय गोपाल झामरे (८८), पृथ्वी मनीष गावंडे (८७), संस्कृती विनायक पाठक (८६), हर्षित प्रफुल्ल घोडोहर (८६), श्रीवल्लभ अमित देशमुख, सई नितीन पाटील, गार्गी भावसार, अथर्व सोहन नावकार (८५) आदी विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश प्राप्त केले.
या परीक्षेत पुणे येथील उर्विका खाडे हिने राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता सातवीपर्यंत विझ्डमची शिष्यवृत्ती मिळणार आहे.