अनुसूचित जमाती कल्याण समिती २८ जानेवारीला अकोल्यात
By Admin | Updated: January 20, 2016 02:05 IST2016-01-20T02:05:13+5:302016-01-20T02:05:13+5:30
जिल्हा परिषद, महानगरपालिकासह विविध विभागाच्या कारभाराचा घेणार आढावा.

अनुसूचित जमाती कल्याण समिती २८ जानेवारीला अकोल्यात
अकोला: विधिमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती २८ जानेवारीपासून तीन दिवसांच्या अकोला दौर्यावर येणार आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिकासह विविध विभागाच्या कारभाराचा आढावा या समितीकडून घेण्यात येणार आहे. अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणार्या विविध योजनांची अंमलबजवणी, तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील अधिकारी व कर्मचार्यांची मंजूर पदे, कार्यरत अधिकारी व कर्मचारी, पदोन्नती आणि रिक्त पदांचा अनुशेष यासंदर्भात अनुसूचित जमाती कल्याण समितीकडून आढावा घेण्यात येणार आहे.