सीसी कॅमेऱ्यातून महिलेला पाहणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 13:30 IST2018-10-15T13:29:04+5:302018-10-15T13:30:08+5:30

सीसी कॅमेऱ्याद्वारे समोरच्या दुकानातील महिला बाळाला स्तनपान करीत असतानाचे छायाचित्रण पाहणाऱ्या दुकानदाराविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

saw woman in CC camera; a complaint of molestation against shop oweners | सीसी कॅमेऱ्यातून महिलेला पाहणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

सीसी कॅमेऱ्यातून महिलेला पाहणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

अकोला : मलकापूर परिसरातील समोरासमोर असलेल्या दुकानांमधील एका दुकानदाराने लावलेल्या सीसी कॅमेऱ्याद्वारे समोरच्या दुकानातील महिला बाळाला स्तनपान करीत असतानाचे छायाचित्रण पाहणाऱ्या दुकानदाराविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर येथील गुरुकुल नगरात दोन दुकाने समोरासमोर आहेत. यामधील एक किराणा दुकान असून, दुसरे दुकान कटलरीचे आहे. कटलरी दुकानाचे मालक मोरे व त्याचा साळा आहे. मोरे नामक इसमाने त्याच्या दुकानातील सीसी कॅमेरा समोरील किराणा दुकानातील पूर्ण भाग दिसेल, अशा पद्धतीने लावला. या सीसी कॅमेºयात समोरील किराणा दुकानात कोण काय करतेय, हे पूर्णपणे दिसत होते. अशातच किराणा दुकानातील एक महिला तिच्या बाळाला स्तनपान करीत असतानाचा प्रकार मोरेच्या दुकानातील सीसी कॅमेºयात कैद झाला. कटलरी दुकानदार मोरे याने वाईट उद्देशाने किराणा दुकानदाराच्या पत्नीच्या चित्रीकरणाच्या उद्देशाने सीसी कॅमेरे लावल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी कटलरी दुकानदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title: saw woman in CC camera; a complaint of molestation against shop oweners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.