सर्वोपचार रुग्णालयातील अस्वच्छता ठरतेय रुग्णांसाठी घातक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:27 IST2020-02-08T13:27:30+5:302020-02-08T13:27:36+5:30

स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नसल्याने डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे.

Sarvopchar Hospital : uncleanness dangerous for patients! | सर्वोपचार रुग्णालयातील अस्वच्छता ठरतेय रुग्णांसाठी घातक!

सर्वोपचार रुग्णालयातील अस्वच्छता ठरतेय रुग्णांसाठी घातक!

अकोला: संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असताना, सर्वोपचार रुग्णालय परिसरात अस्वच्छता वाढली आहे. परिणामी, माशांसह डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. हा प्रकार रुग्णांसाठी घातक ठरत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. बहुतांश काम हे कंत्राटी कर्मचाºयांच्या भरवशावर चालते; मात्र येथील रुग्ण संख्या अन् त्यांच्या नातेवाइकांची संख्या पाहता सफाई कर्मचाºयांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात नेहमीच स्वच्छतेचा अभाव असतो. अशा परिस्थितीत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून रुग्णालय परिसरातच उघड्यावर खाद्यपदार्थ टाकण्यात येतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय, येथील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नसल्याने डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. उपचारासाठी येणाºया रुग्णांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. रुग्णच नाही तर येथील डॉक्टर आणि इतर कर्मचाºयांनाही या परिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे.

स्वच्छ पिण्याचे पाणीही मिळेना!
अपघात कक्ष परिसरात रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र परिसरात सर्वत्र अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. हे पाणी स्वच्छ करून दिले जात असले, तरी परिसरातील अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या आरोग्यासाठी घातकच ठरत आहे.

दिवसातून दोन वेळ स्वच्छता
सफाई कर्मचाºयांची संख्या मर्यादित असल्याने रुग्णालयात केवळ दोन वेळा स्वच्छता केली जात असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांचे म्हणणे आहे. ही स्वच्छता केवळ वॉर्डात केली जाते. वॉर्डाबाहेरील परिसरात स्वच्छता केली जात नसल्याने या ठिकाणी नेहमीच अस्वच्छता दिसून येते.

सांडपाण्याचे डबके
सर्वोपचार रुग्णालयातील जुन्या इमारतीमधून सांडपाण्याची गळती होत असल्याने येथे डबके साचले आहे. याच खाद्यपदार्थ टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येथे डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे.

 

Web Title: Sarvopchar Hospital : uncleanness dangerous for patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.