घरी शौचालय नसल्याने वाशिंबाचे सरपंच अपात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST2021-07-16T04:14:29+5:302021-07-16T04:14:29+5:30

२०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत वाशिंबा सरपंच व सदस्यपदाची निवडणूक झाली. सरपंचपदासाठी गुणवंती शेषराव वानखडे यांनी ...

Sarpanch of Washim disqualified due to lack of toilet at home! | घरी शौचालय नसल्याने वाशिंबाचे सरपंच अपात्र!

घरी शौचालय नसल्याने वाशिंबाचे सरपंच अपात्र!

२०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत वाशिंबा सरपंच व सदस्यपदाची निवडणूक झाली. सरपंचपदासाठी गुणवंती शेषराव वानखडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्जासोबत शौचालय असल्याचा व त्याचा नियमित वापर करीत असल्याचा ग्रामसभेचा ठराव किंवा स्वतःचे शौचालय असल्याचे घोषणापत्रे त्यांनी जोडली नाहीत. त्यामुळे राजेंद्र वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (१) ज ५ अन्वये याचिका दाखल केली. या याचिकेवर जिल्हाधिकाऱ्यांनी ९ मार्च २०२१ रोजी त्यांना सरपंचपदावरून अपात्र घोषित केले होते. त्यानंतर या निर्णयाविरोधात गुणवंती वानखडे यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले. हे अपील विभागीय आयुक्त अमरावती यांनी १२ जुलै रोजी फेटाळत, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे आता ग्रामपंचायत वाशिंबाचे सरपंचपद रिक्त झाले आहे. याप्रकरणी याचिकाकर्ते राजेंद्र वानखडे यांची बाजू ॲड. संतोष राहटे यांनी मांडली, तर गुणवंती शेषराव वानखडे यांची बाजू ॲड. अभय थोरात यांनी मांडली.

Web Title: Sarpanch of Washim disqualified due to lack of toilet at home!