शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

संतोष शर्मा हत्याकांड :  आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 11:38 IST

आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांच्या न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच आर्म्स अ‍ॅक्टमध्येही आरोपीस शिक्षा सुनावली आहे.

अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुंगटा टायर्ससमोरून दुचाकीवर जात असलेल्या संतोष शर्मा यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करणाऱ्या मध्य प्रदेशातील रामेश्वर ऊर्फ बबलू सनोडिया या आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांच्या न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच आर्म्स अ‍ॅक्टमध्येही आरोपीस शिक्षा सुनावली आहे. या हत्याकांडातील एक आरोपी अद्यापही फरार असून, दुसºया आरोपीची सबळ पुराच्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.रामनगर येथील रहिवासी संतोष घनश्याम शर्मा हे त्यांच्या दुचाकीने २१ जून २०१६ रोजी एमआयडीसीतून घरी परत येत असताना त्यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला होता. तीन वेळा गोळी झाडल्यानंतर एक गोळी संतोष शर्मा यांच्या शरीरात घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी संतोष शर्मा यांचे बंधू यशवंत शर्मा यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात मारेकºयांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, १२० ब, ३४, ११८ आर्म्स अ‍ॅक्टच्या कलम ४,२५, २७ नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. ही हत्या तसेच गोळीबाराची सुपारी देऊन झाल्याचा संशय आल्याने पोलिसांनी तपास करताना मध्य प्रदेशातील शिवणी जिल्ह्यातील रहिवासी रामेश्वर ऊर्फ बबलू कवरसिंह सनोडिया त्याचा नातेवाईक ईश्वर ऊर्फ गोलू जीवनलाल सनोडिया या दोघांना अटक केली. तर तिसरा आरोपी राजकुमार कवरसिंह यादव अद्यापही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या खून खटल्यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाने १५ साक्षीदार तपासल्यानंतर सोमवारी निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी रामेश्वर ऊर्फ बबलू सनोडिया यास ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कलम ११८ अन्वये सात वर्षांचा कारावास, २ हजार रुपये दंड तसेच आर्म्स अ‍ॅक्ट अन्वये ३ वर्षांचा कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. तर बबलू हा आरोपी गोलू याच्या घरी घटनेपूर्वी थांबल्याचा कोणताही पुरावा गोलूविरुद्ध नसल्याने गोलूची निर्दोष सुटका करण्यात आली.बॅलेस्टिक अहवाल ठरला मैलाचा दगडतपासामध्ये घटनास्थळावरून देशी कट्ट्याच्या काडतूसची कॅप जप्त केली होती. त्यानंतर त्यांनी अटक केलेला आरोपी बबलू याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात देशी कट्टा व तीन काडतूस जप्त केले. घटनास्थळावरील कॅप व घरातील काडतूसच्या कॅपमध्ये साधर्म्य असून, जप्त केलेल्या देशी कट्ट्यातूनच गोळी झाल्याचे प्रमाणपत्र मिळवले. हा पुरावा सरकार पक्षासाठी महत्त्वाचा ठरला.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेप